शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अमरीश घाटगेंची उमेदवारीच कळीचा मुद्दा!

By admin | Updated: February 8, 2015 00:49 IST

पी. एन., सदाशिवराव मंडलिक आग्रही : विक्रमसिंह घाटगे, हसन मुश्रीफ यांचा विरोध

राजाराम लोंढे / कोल्हापूर ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सत्तारूढ गटाच्या पॅनलमध्ये विद्यमान अठरापैकी दहा संचालकांची नावे निश्चित आहेत. तिघांच्या वारसदारांना संधी मिळणार असून, दोन जागांची अदलाबदल होऊ शकते. केवळ अमरीश घाटगे यांची उमेदवारीच सत्तारूढ गटाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा ठरणार आहे. घाटगे यांच्या उमेदवारीला विक्रमसिंह घाटगे यांच्यासह हसन मुश्रीफ यांनी थेट विरोध केला आहे; तर पी. एन. पाटील, सदाशिवराव मंडलिक हे आग्रही राहणार असल्याने हा पेच सोडविणार कसा, यावरच पॅनलची रचना ठरणार आहे. ‘गोकुळ’ची उमेदवारी ही ठरावांच्या संख्येवरच ठरते. त्यामुळेच अरुण नरके, अरुण डोंगळे, विश्वास पाटील, रवींद्र आपटे, दिलीप पाटील, रणजितसिंह पाटील, दीपक पाटील, धैर्यशील देसाई, अनुराधा पाटील व पी. डी. धुंदरे या दहाजणांचे स्थान पक्के आहे. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. तथापि त्यांना त्यांच्या तीन अपत्यांची अडचण आल्यास उमेदवारीची संधी जयश्री आनंदराव पाटील यांना मिळू शकते. राजकुमार हत्तरकी यांचे सुपुत्र सदानंद यांना संधी मिळणार आहे. निवास पाटील यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र उदय पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. अरुंधती घाटगे यांच्या ऐवजी अमरीश घाटगे यांना पॅनलमध्ये घेण्यासाठी संजय घाटगे यांचे प्रयत्न आहेत; पण घाटगे यांना उमेदवारीच द्यायची नाही, या अटीवर हसन मुश्रीफ व विक्रमसिंह घाटगे यांनी सत्तारूढ गटाला पाठिंबा दिल्याचे समजते. या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा आहे; पण घाटगे यांच्या उमेदवारीसाठी पी. एन. पाटील व सदाशिवराव मंडलिक हे आग्रही आहेत. पन्हाळा तालुक्यातून अरुण नरके यांचे समर्थक विश्वास जाधव हे भटक्या विमुक्त गटातून प्रतिनिधित्व करीत आहेत; पण पी. एन. पाटील यांनी थेट अरुण नरके यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पन्हाळ्यातील एक जागा ‘पी. एन.’ यांना देऊन हा वाद मिटू शकतो. दिनकर कांबळे, सुरेश पाटील यांच्या पॅनलमधील समावेशाबाबत साशंकता आहे. विधानसभेच्या भीतीनेच ‘अमरीश’ना विरोध कागलच्या राजकारणात संजय मंडलिक, नविद मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे व अमरीश घाटगे ही पिढी सक्रिय झालेली आहे. या चौघांमध्ये अमरीश घाटगे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून चांगले नेटवर्क तयार केले आहे. ‘गोकुळ’मध्ये संधी दिली तर ते अधिक सक्रिय होऊन विधानसभेला डोकेदुखी होऊ नयेत, यासाठी अमरीश यांना येथेच रोखण्याची व्यूहरचना विरोधकांनी आखली आहे. चौगलेंची जागा चंदगडला! ३२३ ठराव असलेला चंदगड एकमार्गी करण्यासाठी येथे दीपक पाटील यांच्याबरोबर राजेश नरसिंग पाटील यांना उमेदवारी देऊन सदाशिवराव मंडलिक यांची ताकद घेता येऊ शकते. यासाठीच बाबासाहेब चौगले यांच्या जागी राजेश पाटील यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यांची उमेदवारी निश्चित अरुण नरके, अरुण डोंगळे, विश्वास पाटील, रवींद्र आपटे, दिलीप पाटील, धैर्यशील देसाई, अनुराधा पाटील, पी. डी. धुंदरे, रणजितसिंह पाटील, दीपक पाटील. ‘करवीर’मध्ये इच्छुकांची मांदियाळी करवीरमधील ५८४ ठरावांपैकी शंभरहून अधिक ठराव विरोधात आहेत. करवीरला पाचऐवजी चार जागा द्याव्यात, अशी मागणी ज्येष्ठ संचालकांची आहे. यामध्ये चुयेकर, विश्वास पाटील, उदय पाटील हे निश्चित आहेत. उर्वरित एका जागेसाठी सुरेश पाटील यांच्यासह बाळासाहेब खाडे, चंद्रकांत बोंद्रे, पांडबा यादव, दशरथ माने, शहाजी पाटील, प्रकाश पाटील-कोगेकर, एस. के. पाटील, तुकाराम पाटील, हंबीरराव वळके, अशोकराव खोत इच्छुक असल्याने येथे ‘पी. एन’ यांना कसरत करावी लागणार आहे.