शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बच्चन वेड्यांनी साजरा केला अमिताभ यांचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 11:14 IST

‘अ‍ॅग्री यंग मॅन’ म्हणून जगभरातील रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस बुधवारी कोल्हापुरातील बच्चनवेड्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला.

कोल्हापूर : ‘अ‍ॅग्री यंग मॅन’ म्हणून जगभरातील रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस बुधवारी कोल्हापुरातील बच्चनवेड्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. बच्चन यांचे गाजलेले डायलॉग, गाणी यांच्या सादरीकरणानेही रसिक मंत्रमुग्ध झाले.

महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शशी गजगेश्वर रिक्षावाला यांच्यासह बच्चनवेडे कोल्हापुरी ग्रुपचे सर्व सदस्य शिवाजी चौकात आले. येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व ‘जय शिवाजी, जय भवानी’चा जयघोष करण्यात आला. ग्रुपमधील सदस्यांनी ‘हम जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती हैं...’ यासारखे गाजलेले डायलॉग ‘मैं हूँ डॉन...’ , ‘जहाँ तेरी ये नजर हैं..’ सारखी गाणी सादर केली.

बच्चनवेड्यांचा हा उत्साह पाहून या जल्लोषात तेथे उपस्थित नागरिकही सहभागी झाले. त्यानंतर इंडो बेकरीचे उमर मिरशिकारी यांनी आणलेला केक केक कापण्यात आला. जयेशभाई ओसवाल यांनी साखर वाटली. सुभाष गुंदेशा यांनी चहाची व्यवस्था केली.

यावेळी येत्या शनिवारी व रविवारी होणाºया बच्चन फिल्म फेस्टिव्हलच्या प्रवेशिकांची विक्री करण्यात आली. या प्रवेशिका बिंदू चौक ते शिवाजी चौक रोडवरील हेमंत स्पोर्टस् येथे उपलब्ध आहेत. या उपक्रमात सुधर्म वाझे, किरण पाटील, राजय नांद्रे, दीपक घार्गे, सचिन मणियार, वसीम जमादार, कुंदन जमादार, श्रीकांत घोडके, लक्ष्मण कांबळे, सूरज नाईक, सचिन गायकवाड, विश्वनाथ पोवार, विश्वनाथ कोरी, माधवी शहा, शुभदा कुलकर्णी, डॉ. गीता पिल्लई, डॉ. हर्षला वेदक, डॉ. शिवाजी जाधव, नीलम कक्कड, आनंद पराडकर, सरिता सुतार, रामदास रेवणकर, ‘आम्ही बच्चन ग्रुप’चे सुभाष घाटगे, रेवती देशपांडे, रतन भाकरे, ज्योती कुमठेकर, स्मिता माने, सुनीता शिंदे, प्रकाश सुतार आदी उपस्थित होते. दुसरीकडे ‘स्वरनिनाद’ व नितीन जाधव कल्चरल फौंडेशनतर्फे केशवराव भोसले नाट्यगृहात ‘बॉलिवूड शहेनशहा अमिताभ’ हा कार्यक्रम सादर झाला.बच्चनवेड्यांनी घेतली अमिताभ यांची भेटअ‍ॅडमिन सुधर्म वाझे यांच्या बच्चनवेडे कोल्हापुरी ग्रुपच्या सदस्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. राजू बोरगांवे यांनी प्रयत्न करून सेटवर अमिताभ यांना भेटण्याची तारीख व वेळ मिळविली. तीन तास ‘कौन बनेगा करोडपती’चा कार्यक्रम व त्यानंतर प्रत्यक्ष बच्चन यांच्या अर्ध्या तासांच्या भेटीने सदस्य मंत्रमुग्ध झाले. यावेळी प्राचार्य किरण पाटील, सुधर्म वाझे, राजू बोरगांवे, प्रसाद जमदग्नी, प्रशांत शालगर, दीपक अष्टेकर, राजस नांद्रे, आनंद पराडकर, हर्षला वेदक, शिल्पा पुसाळकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.