शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी बियाणे, खते विक्रीसंबंधीच्या कायद्यातील सुधारणा हप्तेखोरीसाठीच; रघुनाथ पाटील यांचा आरोप

By भीमगोंड देसाई | Updated: November 19, 2023 14:56 IST

सुधारित कायदा आल्यास ७० हजार दुकानदार अडचणीत

कोल्हापूर : कृषी बियाणे आणि खते विक्रीसंबंधीच्या कायद्यात कृषीमंत्री धनंजय मुंडे सुधारणा करणार आहेत. सुधारित कायद्यात सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना कारवाईच्या कक्षेतून बाजूला ठेवून बोगस, नकली बियाणे, खते विक्रीप्रकरणी केवळ विक्रेत्यांनाच दोषी धरून त्यांना सराईत गुंडावरील कारवाई प्रस्तावित केली आहे. विक्रेते, उत्पादक कंपन्यांकडून हप्ता वसुलीसाठीच हा सुधारित कायदा आणला जात आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, सुधारित कायदा येत्या अधिवेशनात पारित झाल्यास राज्यातील ७० हजार कृषी बियाणे, खते विक्रेते अडचणीत येणार आहेत. त्यांनी बियाणे, खते विक्री बंद केली तर शेतकरी अडचणीत येईल. म्हणून हे सरकारच बदलावे लागेल. सध्या ऊस दराचे आंदोलन सुरू आहे. दर कमी मिळण्यास माजी खासदार राजू शेट्टी आणि साखर कारखानदार यांचे संगनमतच कारणीभूत आहे. यामुळे आम्ही यंदाच्या उसाला पाच हजार रूपये प्रतिटन मिळावेत, अशी मागणी करीत आहोत.

संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट म्हणाले, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी बियाणे, खते विक्रीसंबंधीच्या कायद्यात सुधारणा करून हप्तेखोरीला प्रोत्साहन देणार आहेत. त्यांचा इतिहासच हप्ताखोरीचा आहे. त्यांच्या ताब्यातील साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील उसाचे पैसे दिलेले नाहीत. यावरून ते शेतकरी हिताचा विचार करीत नाहीत हे समोर येते.ते कारखानदारांचे बगलबच्चेचशेट्टी यांच्या घरासमोर आंदोलनाची भाषा करणारे कारखानदारांचे बगलबच्चेच आहेत, असेही पाटील यांनी फटकारले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर