शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाच्या पायाभरणीतच रुतला ‘आंबेओहळ’

By admin | Updated: July 23, 2015 00:27 IST

प्रकल्प १८ वर्षे रखडला : केव्हा होणार पाणीसाठा ? जनतेचा प्रश्न; अनेक प्रश्न प्रलंबितच

गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी आंबेओहळ प्रकल्पाचे गेले १८ वर्षे भिजत घोंगडे पडले आहे. मुळचा २९ कोटींचा प्रकल्पखर्च आता ११४ कोटींवर गेला असून, अद्याप २० टक्के काम बाकी आहे. त्यासाठी अंदाजे ५० कोटींच्या निधीची अपेक्षा आहे. पुर्नवसनाचा व भूसंपादनाचा तिढाही अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. किमान आता युती शासनाच्या काळात तरी रखडलेल्या या प्रकल्पाचे भाग्य उजळावे, अशी येथील जनतेला अपेक्षा आहे. त्यानिमित्त या प्रकल्पाचे वास्तव मांडणारी लेखमाला आजपासून...रविंद्र येसादे ल्ल उत्तूरआजरा तालुक्यातील आंबेओहळ ओढ्यावर पाटबंधारे प्रकल्प उभारण्यास १९९७ साली तांत्रिक मान्यता मिळाली. मात्र या प्रकल्पाच्या जागा निश्चितीपासूनच संघर्षास सुरुवात झाली, ती आजअखेर कायम आहे. आजरा-उत्तूर मार्गावर ‘चिमटा’ या ठिकाणी प्रकल्पाचे क्षेत्र प्रथम निश्चत करण्यात आले मात्र याला विरोध झाल्यानंतर आर्दाळ, करपेवाडी येथील आंबेओहळ ओढ्यावर प्रकल्प उभा करण्याचा निर्णय झाला व त्याला १६/१०/१९९८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, प्रकल्पाचे काम सुरू होऊ नये म्हणून प्रचंड विरोध झाला. उत्तूर, करपेवाडी, व्होन्याळी, आर्दाळ येथील स्थानिकांनी स्थापन केलेल्या समित्या, धरणकृती समित्या यामुळे प्रकल्पास विरोध होऊ लागला. ११३ विस्थापितांना सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून ताब्यात घेऊन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. तत्कालिन आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाने २९.३१ कोटी रकमेस १९९८ साली प्रशासकीय मान्यता दिली. आणी धरणाच्या कामास सुरुवात झाली. पहिली चार वर्षे प्रकल्पाचे काम व पुनर्वसन धुमधडाक्यात सुरू झाले. त्यानंतर मात्र कधी भूसंपादन तर कधी पुनर्वसन तर कधी निधीची चणचण यामुळे हा प्रकल्प रखडत गेला. प्रकल्पग्रस्तांना द्यावी लागणारी जमीनआंबेओहळ प्रकल्पग्रस्तांना ६५ टक्के रक्कम भरून याच लाभक्षेत्रातील उत्तूर, आर्दाळ, वडकशिवाले, महागोंड, हालेवाडी, पेंढारवाडी, महागोंडवाडी या आजरा तालुक्यातील, तर शिपूर, कडगाव, लिंगनूर, करंबळी, अत्याळ, गिजवणे, बेकनाळ या गडहिंग्लज भागातील जमिनी मिळणार आहेत. तसेच चित्री लाभक्षेत्रातील जमिनीही द्यावी लागणार आहे.सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारेप्रकल्पातील पाण्याचा वापर पूर्ण क्षमतेने व्हावा, यासाठी सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. उत्तूरपर्यंत चार बंधारे, शिप्पूर, करंबळी व गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे प्रत्येकी एक बंधारा बांधण्यात येणार आहे.लाभ क्षेत्र : गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर क्षेत्र, तर आजरा तालुक्यातील २१२२ हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे सिंचनखाली येणार आहे. उत्तूर, मुमेवाडी, चव्हाणवाडी (ता. आजरा) तर शिप्पूर, कडगाव, लिंगनूर, गिजवणे (ता. गडहिंग्लज), ही गावे लाभक्षेत्रात येतात. दोन गावठाणेप्रकल्पग्रस्तांना निवाऱ्यासाठी लिंगनूर व कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे गावठाणे सर्व सोयिनियुक्त उभी करण्यात येणार आहेत.०.५० मे. वॅट वीज निर्मितीप्रकल्पात पाणीसाठा झाल्यानंतर ०.५० मे. वॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. बुडीतक्षेत्रउत्तूर, करपेवाडी व आर्दाळ गावांमध्ये धरण पाया, सांडवा व खाणक्षेत्रासाठी १२४ हेक्टर इतकी जागा जाते. आर्दाळ, हालेवाडी, होन्याळी, महागोंड व वडकशिवाले, आदी गावांतील सुमारे ३९५ हेक्टर क्षेत्र बुडीत आहे. कोणतेही गाव पूर्णपणे बुडीत क्षेत्रात जात नाही.