शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर केवळ दलित नेते नसून सर्वश्रेष्ठ भारतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 00:51 IST

नरेंद्र जाधव यांचे प्रतिपादन : शिवाजी विद्यापीठ आयोजित डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमाला

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ दलितांचे नेते म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय असून, त्यांचे भारतीय समाजाप्रती एकूण राष्ट्रीय योगदान पाहता ते सर्वश्रेष्ठ भारतीय होते, असेच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी शनिवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्यावतीने आयोजित पुढारीचे संस्थापक डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय कार्य’ या विषयावर ते बोलत होते. शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. व्यासपीठावर बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव उपस्थित होते.यावेळी डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत की, मी प्रथमत: भारतीय आहे, नंतरही भारतीय आहे आणि अंतिमत:ही भारतीय आहे. स्वत:च्या भारतीयत्वाविषयी इतक्या नि:संदिग्धपणे आणि अभिमानपूर्वक प्रतिपादन करणारा नेता या देशात दुसरा झाला नाही. या तीव्रतर भारतीयत्वाच्या जाणिवेतून भारतीय राज्यघटनेची अमोल देणगी त्यांनी भारतीय समाजाला प्रदान केली, हे त्यांचे भारतीय समाजावर थोर उपकार आहेत, याची जाणीव आपण बाळगली पाहिजे. डॉ. आंबेडकर हे दलितांचे नेते, कैवारी होतेच, तसेच राज्यघटनेचे शिल्पकारही होते; पण त्यापुढे जाऊन ते एक थोर विधिज्ज्ञ आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञही होते. बाबासाहेबांनी कायद्याचा अभ्यास केला असला तरी त्यांचे सर्व प्रबंध आणि पदव्या अर्थशास्त्रातील आहेत. त्यामुळेच ते भारताचे सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ असल्याचे स्पष्ट होते.डॉ. जाधव म्हणाले, ‘बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यात अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या संदर्भातील भूमिकांमुळे वेळोवेळी राजकीय आणि तात्त्विक मतभेद उद्भवले. तरीही बाबासाहेबांचा भारतीय मंत्रिमंडळातील प्रवेश हा महात्मा गांधी यांच्या आग्रहामुळेच होऊ शकला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. दोघांमधील संबंध कटुतेचे असले तरी, व्यक्तीपेक्षा देश मोठा, हा संदेश देणारी कृती गांधीजींची राहिली, हे लक्षात घेतले पाहिजे.विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. रसिका कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ( प्रतिनिधी )२५ व्याख्यानांचा ग्रंथडॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आपले मौलिक विचार प्रकट केले आहेत. यामधील निवडक २५ व्याख्यानांचा समावेश असणारा ग्रंथ शिवाजी विद्यापीठाच्यावतीने प्रकाशित करण्याची घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात केली.