कोल्हापूर : खग्रास चंद्रग्रहणामुळे करवीरनिवासिनी अंबाबाईचा रथोत्सव यंदा वीस मिनिटे उशिराने निघणार आहे. रात्री साडेनऊ ऐवजी ९ वाजून ५० मिनिटांनी रथोत्सवास सुरुवात होईल. जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. जोतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सव असतो. देवीची उत्सवमूर्ती रथातून नगरप्रदक्षिणेला निघते. या पार्श्वभूमीवर बुधवारी जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे बैठकीचे आयोजन केले होते. सहा. पो. नि. जी. एम. लांडगे, मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव, महादेव डबाणे, अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी, सुरेश जरग, किरण नकाते, श्रीपूजक अजित ठाणेकर, माधव मुनिश्वर उपस्थित होते. यंदा शनिवारी (दि.४) रथोत्सव आहे. मात्र, खग्रास चंद्रग्रहण आहे. संध्याकाळी सव्वासात वाजता चंद्रग्रहण सुटणार आहे. त्यानंतर अंबाबाईच्या मूर्तीला अभिषेक, आरती हे धार्मिक विधी करण्यासाठी वेळ लागणार. त्यामुळे रात्री साडेनऊऐवजी नऊ वाजून ४५ मिनिटांनी रथोत्सवाला सुरुवात होईल. तोफेच्या सलामीनंतर रथ नगरप्रदक्षिणेला निघेल. ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर रथ पुन्हा मंदिरात येईल. कळसाचे दर्शन घडावे यासाठी शनिवारी रात्रभर मंदिर खुले राहणार आहे. (प्रतिनिधी)रांगोळी आकार कमी व्हावाअंबाबाईच्या रथोत्सवात व नगरप्रदक्षिणेत मार्गावरील रांगोळ््या हे विशेष आकर्षण असते. यादिवशी विविध संस्थांच्यावतीने पूर्ण रस्त्यात रांगोळीचा गालिचा घालता जातो. मात्र, या मोठ-मोठ्या रांगोळ््यांमुळे बाजूला उभ्या असलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होते. त्यामुळे हा रांगोळ््यांचा आकार थोडा कमी करावा, अशी मागणी आली.
अंबाबाईचा रथ निघणार उशिरा
By admin | Updated: April 2, 2015 00:41 IST