शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई ही आई म्हणून स्वीकारला शालू

By admin | Updated: October 22, 2015 01:16 IST

देवस्थान समितीची भूमिका : ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर : आजवर आम्ही तिरूपतीहून येणारा शालू अंबाबाई ही विष्णूपत्नी असल्याच्या गैरसमजातून स्वीकारत होतो. आता मात्र ती पत्नी नसून आदिशक्ती व विष्णूची आई असल्याचे सत्य समोर आले आहे. त्यामुळे नवरात्रात येणारा हा शालू मुलाने आपल्या आईला पाठविलेले वस्त्र, या भावनेतून स्वीकारत आहोत, अशी भूमिका पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सदस्या संगीता खाडे यांनी बुधवारी स्पष्ट केली. या भूमिकेमुळे गेल्या वर्षभरापासून ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. तिरूपती-बालाजी देवस्थानहून दरवर्षी देशभरातील शक्तिपीठांना नवरात्रौत्सवात शालू पाठविला जातो. वीस वर्षांपूर्वी देवस्थान समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना झालेल्या गैरसमजुतीतून अंबाबाई ही बालाजी पत्नी असल्याचा चुकीचा प्रचार सुरू झाला. त्यामुळे अंबाबाई मंदिराचा मूळ इतिहास पुसला जात होता. मात्र, गतवर्षी नवरात्रात ही देवी आदिशक्ती आणि सती रूप साडेतीन शक्तिपीठ असल्याच्या सत्यतेवर ‘लोकमत’ने पुराव्यांनिशी प्रकाश टाकला होता. ‘महालक्ष्मीचा इतिहास बदलतोय’ या मालिकेद्वारे ही वस्तुस्थिती मांडून कोल्हापूरकरांमध्ये असलेला संभ्रम दूर केला होता. त्यानंतर गेले वर्षभर विविध वृत्तांच्या माध्यमातून या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला व सुरू झालेल्या चुकीच्या प्रथांवर सडेतोडपणे भाष्य केले होते. देवस्थान समितीने स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे ‘लोकमत’ने केलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश आलेआहे.अष्टमीला बुधवारी सकाळी तिरूपती देवस्थानचे सहा. कार्यकारी अधिकारी आर. सेवलम व के. वाणी हे शालू घेऊन भवानी मंडपात आले. येथून वाद्यांच्या गजरात मिरवणुकीद्वारे अंबाबाई मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली नंतर शालू अंबाबाई चरणी अर्पण करून देवस्थानच्या सदस्या संगीता खाडे व सचिव शुभांगी साठे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर संगीता खाडे यांनी शालू स्वीकारण्यामागची देवस्थान समितीची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. त्या म्हणाल्या, दरवर्षी तिरूपतीहून अंबाबाईला शालू आणला जातो. परंपरेप्रमाणे आम्ही तो शालू स्वीकारला आहे पण तो पत्नी म्हणून नव्हे तर आई म्हणून. मुलाने आपल्या आईला पाठविलेली भेट म्हणून हा शालू यापुढे स्वीकारला जाईल. उद्या, दसऱ्यादिवशी सकाळी तो अंबाबाईला अर्पण करण्यात येईल. यावेळी देवस्थानचे सदस्य प्रमोद पाटील, दादा परब, व्यवस्थापक धनाजी जाधव उपस्थित होते. यावेळी तिरुपती देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांचा अंबाबाईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.अष्टमीला म्हणजेच बुधवारी तिरुपती देवस्थानहून आर. सेवलम यांनी आणलेला शालू मिरवणुकीने अंबाबाई मंदिरात आणण्यात येऊन तो देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.