शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर अतिक्रमणमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : इतकी वर्षे ‘देवस्थान’ला अध्यक्ष नसल्याने ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. आता मात्र समितीचा कोरम पूर्ण झाला असून, धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. याअंतर्गत अंबाबाई मंदिर व बाह्य परिसर अतिक्रमण व प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प आहे. भाविकांना कायमस्वरूपी आरोग्य केंद्रासह अधिकाधिक सुविधा देण्याला प्राधान्यक्रम राहील, अशी माहिती पश्चिम ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : इतकी वर्षे ‘देवस्थान’ला अध्यक्ष नसल्याने ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. आता मात्र समितीचा कोरम पूर्ण झाला असून, धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. याअंतर्गत अंबाबाई मंदिर व बाह्य परिसर अतिक्रमण व प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प आहे. भाविकांना कायमस्वरूपी आरोग्य केंद्रासह अधिकाधिक सुविधा देण्याला प्राधान्यक्रम राहील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. समितीच्यावतीने इतक्या चांगल्या पद्धतीने कामकाज केले जाईल की वर्षभरात त्याचा ‘स्वतंत्र अहवाल’ छापावा लागेल, असा ‘शब्द’ही त्यांनी यावेळी दिला.महेश जाधव यांची देवस्थान अध्यक्षपदी व वैशाली क्षीरसागर यांनी कोषाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जाहीररीत्या पत्रकार परिषद घेऊन समितीची विविध प्रश्नांवरील भूमिका स्पष्ट केली. यावेळी सदस्या संगीता खाडे, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी,अभियंता सुदेश देशपांडे उपस्थित होते.जाधव म्हणाले, समितीच्या अखत्यारित एकूण तीन हजार बेचाळीस मंदिरे असून, दहा हजार ४९२ हेक्टर इतकी जमीन आहे. जमिनींची माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू असून, जमिनीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.अंबाबाई मंदिरातील सुरक्षेसाठी अद्ययावत सीसीटीव्ही बसविले जाणार असून, दोन महिन्यांतून एकदा बैठक घेतली जाणार आहे. विविध सामाजिक कामांसाठीही समिती निधी खर्च करणार असून, समितीच्यावतीने अन्नछत्र व भक्त निवास उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मंदिर परिसरात एकही जाहिरात लागणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाईल. मंदिर विकास आराखडा, जोतिबा मंदिर विकास आराखडा राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्याशिवाय त्र्यंबोली मंदिर परिसर विकास आराखडाही प्रस्तावित आहे.खजानिस वैशाली क्षीरसागर म्हणाल्या, समितीतील भ्रष्टाचाराबाबत सध्या चौकशी सुरू आहे. त्यात जे कोणी दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही.भक्त निवासापासून भाविकांना मोफत बसेससाठी प्रयत्न केले जातील, तसेच अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्यासाठीही समितीचा आग्रह राहील हा निर्णय झाला तर ‘देवस्थान’सह कोल्हापूरचा विकास होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.सचिव विजय पोवार म्हणाले, सन २००७ ते २०१२ या कालावधीतील लेखापरीक्षण अंतिम टप्प्यात आहे. देवस्थान अस्तित्वात येण्यापूर्वीचे ताळेबंद नाहीत. ते तयार करण्याचे आदेश शासनाने दिले असून, ते काम अंतिम टप्प्यात आहे.‘देवस्थान’कडील दागिनेसमितीच्या अखत्यारितीतील मंदिरात आजअखेर ८६ हजार २१ ग्रॅम इतके सोन्याचे, तर २४ लाख २४ हजार ९६१ ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण झाले आहेत.त्यापैकी ४७ हजार ९८४ ग्रॅम सोने व ९ लाख २६ हजार ४७१ इतकी चांदी एकट्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे आहेत. त्याचे रितसर मूल्यांकन झाले आहे.एकूण ठेव सुमारे १०७ कोटींची आहे. आजअखेर एकूण उत्पन्न १३९ कोटी ८९ लाखांचे आहे. एप्रिल २०१७ पासून ३७ लाख खंड वसुली झाली आहे. त्याशिवाय सर्व मंदिरांत मिळून एकूण ३६ दानपेट्या आहेत.लोगोसाठी आवाहनदेवस्थान समितीचे अधिकृत बोधचिन्ह बनविण्यासाठी (लोगो) बोधचिन्ह स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट बोधचिन्ह करणाºया व्यक्ती अथवा संस्थेला एकवीस हजारांचे बक्षीस दिले जाणार असून, इच्छुकांनी त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.