शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई महिषासुरमर्दिनी रूपात

By admin | Updated: October 22, 2015 00:49 IST

अष्टमीची पूजा : दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम; भाविकांचीही मोठी गर्दी

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. कोल्हापूरची अंबाबाई ही असुरांचा संहार करणारी आणि प्रजेचे रक्षण करणारी देवता आहे. आदिशक्ती आणि दुर्गेचे एक रूप असलेल्या या देवीचा सकाळी शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महिषासुरमर्दिनी रूपात तिची पूजा बांधण्यात आली. अष्टमीला दक्षयज्ञाचा विध्वंस करण्यासाठी अत्यंत क्रोधाने भगवान शंकराने आपल्या शरीरातून भद्रकाली, महाघोर रुद्रगण, कोटियोगिनी, असे महाशक्तिगण निर्माण केले. यामुळे अष्टमीची पूजा, उपवास, जागर आणि चंडी होमाला विशेष महत्त्व आहे. महिषासुराच्या अत्याचारांच्या व्यथा घेऊन सर्व देव शंकर व विष्णूकडे गेले. या दैवतांच्या तेजातून निर्माण झालेल्या दुर्गेने घनघोर युद्ध सुरू केले. आपल्या मायावी शक्तीने महिषासुराने अनेक रूपे घेतली. अखेर महिषाचे (रेड्याचे) रूप धारण केलेल्या या दैत्याचा देवीने वध केला; म्हणून अष्टमीला अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधली जाते. ही पूजा मयूर मुनीश्वर, मंदार मुनीश्वर, अरुण मुनीश्वर यांनी बांधली. दिवसभरात नवदुर्गा भजनी मंडळ, अंबिका महिला भजनी मंडळ, आरोही भजनी मंडळ (पुणे), भक्तिसेवा महिला भजनी मंडळ, शाहीर अनंतकुमार साळुंखे (सांगली), रुद्रांश अकॅडमी या संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नवरात्रौत्सवात विविध सामाजिक संस्थांकडून मंदिरात सेवा अर्पण केली जाते. या कार्यात विद्यार्थीही मागे नाहीत. कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या स्काऊट गाईडच्या जवळपास ४० विद्यार्थी-विद्यार्थिनी गेल्या चार दिवसांपासून मंदिर स्वच्छतेच्या कामात गुंतल्या आहेत. मंदिराचा अंतर्बाह्य परिसर स्वच्छ केला जात आहे. (प्रतिनिधी)आज रथारूढ पूजा आज, गुरुवारी खंडेनवमी व दसऱ्यानिमित्त अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात येणार आहे. संध्याकाळी पाच वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची पालखी सीमोल्लंघन सोहळ्यासाठी दसरा चौकाकडे आपल्या लवाजम्यानिशी निघेल. येथे शमीपूजन झाल्यानंतर सिद्धार्थनगरमार्गे ती पंचगंगा नदीघाटावर येईल. येथे पूजन झाल्यानंतर गंगावेश, पापाची तिकटी, गुजरीमार्गे पुन्हा मंदिरात येईल. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता पालखी सोहळा होईल.