शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

चिंता सोडून वर्तमानकाळात नेहमी आनंदात जगा

By admin | Updated: March 22, 2016 00:19 IST

श्वेता जुमानी : टॉक शोमध्ये सखींशी मनमुराद संवाद; अमित असळकर, दुर्गा भिंगार्डे यांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ

\कोल्हापूर : प्रत्येकजण माझे भविष्य कसे असेल, हा विचार करत वर्तमानकाळ वाया घालवितो आणि भूतकाळात केलेल्या चुकांचा विचार करून वर्तमानकाळात दु:खी राहतो. भूतकाळ बदलू शकत नाही आणि भविष्यकाळ तुमच्या हातामध्ये नाही. फक्त वर्तमानकाळ हाच तुमच्या हातात आहे. त्यामुळे भूतकाळ व भविष्यकाळातील चिंता सोडून वर्तमानकाळात आनंदात जगा, असा मोलाचा सल्ला प्रख्यात अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी दिला. राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी ‘लोकमत’ सखी मंचच्या सदस्यांसाठी आयोजित ‘टॉक शो विथ श्वेता जुमानी’ कार्यक्रमात त्यांनी सखींशी मनमुराद गप्पा मारल्या. या कार्यक्रमाचे इम्पलाडेंट व हार्मोकेअर हे प्रायोजक होते.दीपप्रज्वलन करून व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन श्वेता जुमानी यांच्यासह त्यांच्या आई बिंदू जुमानी, डॉ. दुर्गा भिंगार्डे यांच्या हस्ते करण्यात आले.श्वेता जुमानी म्हणाल्या, मी आजपर्यंत केवळ चित्रपटसृष्टीतल्याच नव्हे, तर उद्योग, व्यापार, अर्थकारण अशा इतरही अनेक क्षेत्रांतल्या मंडळींना मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक व्यक्तीची जशी रास असते, तसा भाग्यांकही असतो. या भाग्यांकाची त्यांना मदत होऊ शकते. लहानपणापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्यासोबत एक अंक असतो. शाळेत असताना पाढे, घरचा पत्ता, गाडीचा नंबर, फोन नंबर, बँकेचा नंबर या सर्व गोष्टींमुळे अंक आपल्या सोबत असतात. हेच अंक आपले जीवन सुखी व आनंदी करण्यासाठी मदत करत असतात, असे त्यांनी सांगितले.त्या म्हणाल्या, जीवनात सुख-शांती, प्रगती कोणाला नको असते? अनेकांकडे पैसा आहे, पण शांती नाही. खूप कष्ट करूनसुद्धा प्रगती होत नाही. क्षमता असूनसुद्धा त्यांना मनासारखी प्रगती होत नाही. मात्र, काही लोक काही न करता त्यांच्याकडे पैसा येत असतो. त्यावर अंकशास्त्र हा एक चांगला उपाय आहे. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला सर्व गोष्टी पटकन पाहिजे असतात. अंकशास्त्र हे असे शास्त्र आहे, जे विना जन्मपत्रिका काम करते. यासाठी फक्त जन्मदिनांक खूप महत्त्वाचा ठरतो. अंकशास्त्र अर्थात न्यूमरॉलॉजीचा मी लहानपणापासूनच अभ्यास करण्यास सुरुवात केली. यासाठी माझ्या वडिलांची मला खूप मदत मिळाली. आपली सही कशी असावी, नावाचे स्पेलिंग कसे असावे, जन्मांक, भाग्यांकाचे महत्त्व काय, या विषयावर श्वेता जुमानी यांनी सखींशी संवाद साधल्या. तसेच १ ते ९ अंक, जन्मतारखा कशा व त्यांचे लकी क्रमांक यांची माहिती दिली. दरम्यान, हार्मोकेअरचे डॉ. अमित असळकर यांनी थॉयरॉईडविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच इम्पलाडेंटच्या डॉ. दुर्गा भिंगार्डे यांनी चेहऱ्याचे सौंदर्य व दातांचे महत्त्व याविषयी उपस्थित सखींना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात सखी सदस्या उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)‘लोकमत’मुळे माझी ओळख मला जी काही प्रसिद्धी मिळाली आहे, ती फक्त ‘लोकमत’मुळेच मिळाली आहे. कारण मी अंकशास्त्राविषयी प्रथम ‘लोकमत’मधून लिहिण्यास सुरुवात केली. त्यामुळे माझी ओळख सर्वदूर झाली. माझ्या यशात ‘लोकमत’चे पाठबळ मोठे आहे, असे श्वेता जुमानी यांनी आवर्जून सांगितले.शेवटचे सात दिवस ‘लोकमत’ सखी मंच सदस्य नोंदणी सुरू असून, नोंदणासाठी शेवटचे सात दिवस शिल्लक आहेत. तरी इच्छुक महिलांनी लोकमत शहर कार्यालय व सखी मंच कमिटी मेंबर यांच्याकडे संपर्क साधावा. सखींंना दिलेल्या टिप्स् काळा व लाल रंग वापरू नये.२४ अंक हा शुभ असतो.निळा रंग अत्यंत शुभ असतो.मेहनत करीत रहा.