इचलकरंजी : वीटभट्टी, डंपर, ट्रॅक्टर-ट्रॉली, खाण कामगार अशा ठिकाणी काम करणाऱ्या कष्टकरी मजुरांच्या उन्नतीसाठी कॉँग्रेस पक्षाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. कष्टकरी जनतेला अडचणीवेळी आमचे दार सदैव खुले असेल, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.इचलकरंजी शहर व परिसरातील डंपर, ट्रॅक्टर-ट्रॉली, वीटभट्टी असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यात आवाडे बोलत होते. आवाडे म्हणाले, शहर व गावांच्या विकासाबरोबर तेथील जनतेला विविध नागरी सुख-सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकारकडे असलेल्या विविध योजना आणण्याचे काम आम्ही केले. शहराच्या वाढीमध्ये कष्टकरी वर्गाचे मोठे योगदान आहे. याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आपण माझ्यासाठी उरलेला आठवडा द्यावा. त्यानंतर येणारी पाच वर्षे मी तुमच्यासाठीच कार्यरत असेन. ट्रॅक्टर-ट्रॉली लावण्यासाठी वाहन तळ, विटांसाठी लागणाऱ्या माती-मुरूमावरील रॉयल्टी रद्द व्हावी, वीटभट्टी-डंपर कामगारांना गुंठेवारीमध्ये कर्जे मिळत नाहीत, त्यांना कर्ज देणे, सावकाराच्या पाशातून सोडवणूक करून कष्टकऱ्यांना अर्थसहाय करणे, यासाठी मी प्रयत्न करेन, अशीही ग्वाही त्यांनी दिली.उपनगराध्यक्ष रणजित जाधव, मुकुंद पोवार, आदींची भाषणे झाली. संभाजीराव काटकर, अरुण निंबाळकर, आप्पा धायगुडे, सलीम शेख, बंडू डांगे, जावेद फकीर, जगन्नाथ राणे, चंद्रकांत कुरणे, सिद्धू केंगार, चंद्रकांत इंगवले, आदी उपस्थित होते. राजू नदाफ यांनी सूत्रसंचालन व गणेश करचे यांनी आभार मानले.दरम्यान, प्रकाश आवाडे यांच्या प्रचारासाठी शहापूर व परिसरामध्ये पदयात्रा घेण्यात आली. सायंकाळी जोरदार पाऊस लागूनसुद्धा उत्साहात पदयात्रा पार पाडण्यात आली. पदयात्रेमध्ये घरोघरी साधलेला थेट संपर्क आणि यात्रेचे झालेले उत्स्फूर्त स्वागत यामुळे दुपारच्या भर उन्हातसुद्धा उत्साह होता. नगरसेवक दादासाहेब भाटले, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, शामराव चव्हाण, अरविंद नेमिष्टे, विजय पाटील, समीर मुल्ला, अंबाजी तल्ला, विजय गिरी, रणजितसिंह गायकवाड, सुलोचना हेरवाडे, अमर कांबळे, के. के. कांबळे, संतोष कांदेकर, गंगाराम जाधव, अशोक पुजारी, सावित्री कुंभार, सरस्वती पाटील, भारती तराळ, मनीषा सावंत, रजनी शिंदे, आदी पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
कष्टकरी जनतेसाठी नेहमीच पुढाकार
By admin | Updated: October 7, 2014 23:41 IST