लोकमत न्यूज नेटवर्क सरवडे : इंग्लिश स्कूल म्हणजेच आजचे शिवाजीराव खोराटे विद्यालय या शाळेचे तब्बल ४७ वर्षांनंतर सन १९७४-७५ ची जुनी एस. एस. सी. (अकरावी) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नरतवडे येथील साई - समृद्धी सांस्कृतिक हॉलमध्ये झाला. यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला. काहींनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णुपंत मगदूम हे होते.
आपले वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून पासष्ट - सत्तरीकडे झुकलेले हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षांनंतर आपण एकत्र भेटत आहोत. त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावनाही होतीच; पण एकत्र आले आणि सर्वांनीच गळाभेट घेतली.
कार्यक्रमाचे नेटके संयोजन शामराव रेपे, पी. डी. मोरे, टी. डी. पाटील, रामचंद्र कुंभार, एस. टी. एरुडकर, विष्णू मगदूम यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून 'आरोग्य -संगीत' या विषयावर प्रा. अरविंद मानकर, तर कथाकथनकार डी. डी. परीट उपस्थित होते. यावेळी शामराव सुतार यांचे काव्यवाचनही झाले .
कार्यक्रमाचे स्वागत पी. डी . मोरे यांनी केले. रेपे यांनी प्रास्ताविक केले. बी. एस. पाटील यांनी अहवाल वाचन केले. अशोक एरुडकर यांनी सूत्रसंचालन केले. टी .......... यांनी आभार मानले. .......... फोटो
सरवडे येथील श्री. खोराटे विद्यालयातील सन १९७४-७५ सालाचे दहावीचे सवंगडी.