शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रेडिरेकनरमुळे थांबली अकिवाट एमआयडीसीची ‘वाट’; प्रस्तावाला मंजुरी कधी ?

By पोपट केशव पवार | Updated: December 4, 2024 17:59 IST

पोपट पवार कोल्हापूर : टेक्सटाइल आणि कृषीपूरक उद्योगांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या अकिवाट (ता. शिरोळ) येथील एमआयडीसीच्या सर्व प्रस्तावांना राज्य शासनाने ...

पोपट पवारकोल्हापूर : टेक्सटाइल आणि कृषीपूरक उद्योगांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या अकिवाट (ता. शिरोळ) येथील एमआयडीसीच्या सर्व प्रस्तावांना राज्य शासनाने मंजुरी दिली असली तरी रेडिरेकनर प्रस्ताव अद्यापही मंजुरीसाठी शासन दरबारी अडकल्याने या एमआयडीसीची वाट थांबली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाने या ४७ हेक्टरवर साकारल्या जाणाऱ्या एमआयडीसीचा रेडिरेकनरचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयानेही तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र, अद्याप हा प्रस्ताव मंजुरीविना प्रलंबित आहे.अकिवाट-सैनिक टाकळी या दोन गावांमध्ये महसूल विभागाच्या गायरान ४७ हेक्टर जागेवर ही एमआयडीसी उभी केली जाणार आहे. तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच २०२३ मध्ये या एमआयडीसीला तत्त्वत: मान्यता दिली होती. एमआयडीसीच्या भूसंपादन प्रस्तावाला उच्च अधिकार समितीने २०२३ मध्ये मान्यता दिली.पुढे शासनाने या एमआयडीसीसाठीची जागा औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला दिला होता. औद्योगिक विकास महामंडळाने रेडिरेकनर प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला असून त्यांनीही तो राज्य सरकारकडे पाठवला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर या एमआयडीसीच्या पुढील प्रक्रियेला चालना मिळणार आहे.

महिलांच्या हाताला कामअकिवाट-सैनिक टाकळी येथील एमआयडीसीत महिलांसाठी टेक्सटाइल उद्योग आणण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आग्रही आहेत. त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे महिलांच्या हाताला काम मिळण्याबरोबरच इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील टेक्सटाइल उद्योगांना अधिक गती प्राप्त होणार आहे.

केमिकलविरहित उद्योगांना प्राधान्यशिरोळ तालुक्यात आधीच केमिकलयुक्त अति वापरामुळे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या एमआयडीसीत केमिकलविरहित उद्योगांना अधिक प्राधान्य देण्याचे नियोजन लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे. येथे टेक्सटाइल झोन तयार करून वस्त्रोद्योगाशी संबंधित प्रोसेर्सस, सायझिंग हे उद्योग एकाच छताखाली आणण्याचे नियोजन केले जाणार आहे.दृष्टिक्षेपात अकिवाट एमआयडीसी

  • तत्त्वत : मंजुरी : २०२३
  • जागा : ४७ हेक्टर

सैनिक टाकळी-अकिवाट एमआयडीसीच्या सर्व प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. विधानसभेची आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया थांबली होती. मात्र, आता पुन्हा एमआयडीसीची प्रक्रिया सुरू होईल. या एमआयडीसीत टेक्सटाइल उद्योगांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. -राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार, शिरोळ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसीWomenमहिलाTextile Industryवस्त्रोद्योग