शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

remdesivir Kolhapur : रेमडेसिविरचा कंपन्यांकडून पुरवठा तरी नातेवाईक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 13:02 IST

remdesivir Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या खासगी रुग्णालयांना कंपन्यांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा थेट पुरवठा होत असतानादेखील त्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. आपला माणूस वाचावा म्हणून नातेवाईक धावपळ आणि जीवाचे रान करत नियंत्रण कक्षाकडे इंजेक्शनची मागणी करत आहेत, वस्तुस्थितीत मात्र काही रुग्णालयांकडूनच इंजेक्शनची साठेबाजी होत असल्याचे प्रशासनाला आढळले आहे.

ठळक मुद्देरेमडेसिविरचा कंपन्यांकडून पुरवठा तरी नातेवाईक वेठीस खासगी रुग्णालयातील अनुभव : साठवणुकीचा प्रकार

कोल्हापूर : जिल्ह्यातील मोठ्या खासगी रुग्णालयांना कंपन्यांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा थेट पुरवठा होत असतानादेखील त्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. आपला माणूस वाचावा म्हणून नातेवाईक धावपळ आणि जीवाचे रान करत नियंत्रण कक्षाकडे इंजेक्शनची मागणी करत आहेत, वस्तुस्थितीत मात्र काही रुग्णालयांकडूनच इंजेक्शनची साठेबाजी होत असल्याचे प्रशासनाला आढळले आहे.कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा असून, त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातच नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. येथे सर्व रुग्णालयांकडून रोज इंजेक्शनची मागणी केली जाते.

दिवसाला २ हजार इंजेक्शनची मागणी असताना १०० ते २०० च्या पटीत त्यांचा पुरवठा होत आहे. त्यातूनच सर्व रुग्णालयांना तो पाठवला जातो. एकीकडे रात्रंदिवस नियंत्रण कक्षाकडून ही सेवा बजावली जात असताना दुसरीकडे काही रुग्णालयांमधून साठेबाजी होत असल्याचे दिसून आले आहे.गेल्यावर्षी रेमडेसिविरची मागणी सुरू झाल्यानंतर अनेक मोठ्या रुग्णालयांनी थेट इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी केली होती. त्यांना कंपनीकडून कोडनंबरदेखील देण्यात आला आहे. अशारीतीने रोज या रुग्णालयांना ३० ते ४० इंजेक्शनचा थेट पुरवठा केला जातो. याची यादी रोज जिल्हा प्रशासनाकडे येत असते. असा थेट पुरवठा होत असतानादेखील रुग्णालयांकडून नियंत्रण कक्षाकडे इंजेक्शनची मागणी केली जाते.नियंत्रण कक्षाकडून वैयक्तिकरीत्या इंजेक्शनचा पुरवठा केला जात नसताना रुग्णाच्या नातेवाइकांना इंजेक्शन आणण्यासाठी पळवले जाते. नातेवाईक नियंत्रण कक्षाकडे ही चिठ्ठी घेऊन येतात व इंजेक्शन मिळवण्यासाठी याचना करत असतात. नाहीतर मग काळ्याबाजारातून त्याची खरेदी होते किंवा मग रुग्णालयाकडूनच ते जास्त रकमेने विकत दिले जाते. नियंत्रण कक्षाला केवळ ३ टक्के इतका रेमडेसिविरचा पुरवठा होत आहे.

अशा परिस्थितीत ज्या रुग्णालयांना थेट कंपनीकडून पुरवठा होत नाही त्यांना इंजेक्शन देण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे असताना मोठ्या रुग्णालयांकडून इंजेक्शनची साठेबाजी होत असल्याचे प्रशासनाला आढळले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीरkolhapurकोल्हापूर