शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कोल्हापूर-सांगली मार्गाला पर्यायी रस्ता

By admin | Updated: September 23, 2016 00:35 IST

प्रारूप आराखड्यात प्रस्ताव : आराखडा प्रसिद्ध; हरकतीसाठी चार महिन्यांचा कालावधी

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली महामार्गाला पर्यायी रस्ता, कोल्हापूर शहराबाहेरून रिंगरोड, इचलकरंजीसह काही नागरी संकुलांमध्ये बायपास रस्ता अशा महत्त्वपूर्ण बाबी जिल्ह्याच्या प्रारूप प्रादेशिक आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. हा आराखडा पुण्यात विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या सहीने गुरुवारी प्रसिद्ध झाला. आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रादेशिक योजना नगररचना उपसंचालक कार्यालय येथील फलकावर तो लावण्यात येणार आहे. पुढील २० वर्षांच्या विकासाचा साकल्याने विचार करून विविध आठ अभ्यासगटांनी सादर केलेल्या अहवालांवर चर्चा करून तयार हा आराखडा तयार करण्यात आला. गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या सहीनंतर तो जाहीर करण्यात आला. त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सुनावणी घेण्यासाठी नियोजन समिती स्थापन करण्यात येऊन तिचा अहवाल प्रादेशिक नियोजन मंडळापुढे ठेवला जाईल, त्यात आवश्यक त्या सुधारणा होऊन हा प्रारूप प्रादेशिक आराखडा मंजुरीसाठी राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.सन २०३६ मध्ये कोल्हापूरची प्रस्तावित लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून दळणवळण, प्रादेशिक उद्यान, औद्योगिक विकासासाठी नवीन प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्र, लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने नागरी संकुलांचा विकास, ब्ल्यू लाईन, रेडलाईन सर्व्हे, कोल्हापूर व इचलकरंजीसाठी नवीन रिंगरोड, कोल्हापूर-सांगली महामार्गाला पर्यायी रस्ता, आदी महत्त्वाच्या बाबींचा या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. आराखड्याचे विभागनिहाय नकाशे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यामध्ये एकूण २० विकास केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामध्ये करवीर, इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल आणि गडहिंग्लज या ठिकाणी नागरी संकुले; हुपरी, कोडोली, हातकणंगले या ठिकाणी ग्रामीण विकास संकुले; शाहूवाडी, गगनबावडा, गारगोटी, आजरा, राधानगरी, चंदगड, बांबवडे, कुंभोज, भादोले, अब्दुललाट, दानोळी, उत्तूर या ठिकाणी नागरी विकास केंद्रे, तर सहा तालुका मुख्यालयांचा समावेश आहे. त्याचबरोबर या आराखड्यामध्ये विकास नियंत्रण नियमावली, अभ्यास गटांकडून आलेल्या शिफारशींच्या अहवालाची अंमलबजावणी, जिल्ह्णाचा बृहत् आराखडा, विकास केंद्रांचे सविस्तर नकाशे, सार्वजनिक बांधकाम विभागाचा २० वर्षांचा प्रायोजित आराखडा, इचलकरंजी व काही नागरी संकुलांमध्ये बायपास रस्ता, कोल्हापूर शहराबाहेरून रिंगरोड,पर्यटन विकासासाठी रस्त्यांचे जाळे, चांदोली, दाजीपूर सह्णााद्री व्याघ्र प्रकल्पासाठी बफर झोन प्रस्तावित करण्यात आला आहे.‘एमआर सॅक’च्या माध्यमातून नकाशेपर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी प्रादेशिक उद्यान आवश्यक असून ‘एमआर सॅक’च्या माध्यमातून सॅटेलाईट इमेजवरून नकाशे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये प्रादेशिक आराखड्यामध्ये १९.५पेक्षा जास्त चढ-उतार असलेल्या जमिनींवर प्रादेशिक उद्यान प्रस्तावित करण्यात आले आहे.नगररचना विभागाच्या उपसंचालकांमुळे आराखड्याला गतीजिल्ह्याची नव्याने प्रादेशिक योजना करण्यासाठी १ डिसेंबर २००६ मध्ये प्रादेशिक योजना नगररचना उपसंचालक कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. येथे नगररचना विभागाचे उपसंचालक मो. र. खान यांनी २०१२ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर खऱ्या अर्थाने आराखड्याच्या कामाला गती आली. आराखड्यासाठी आठ अभ्यासगट व सात उपअभ्यास गट तयार करण्यात आले आहेत. आराखड्यात या गटांच्या सदस्यांच्या महत्त्वपूर्ण सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.