शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठरावाबरोबर सचिव, अध्यक्ष अन्‌ प्रोसेंडिंगही दुबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) दुबार ठरावांची बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) दुबार ठरावांची बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये दोन सचिव, दोन अध्यक्षांसह प्रोसेंडिंग दोन दाखल करून ठरावावर दावे करण्यात आले. कागल व शाहुवाडी तालुक्यातील दोन दूध संस्थांमध्ये हा प्रकार समोर आला आहे. संचालक मंडळाचे समान बलाबल आहे, मात्र सचिवाने मखलाशी केल्याने ठरावाचा गुंता निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.

‘गोकुळ’च्या प्रारूप यादीवर ३५ दुबार ठराव, तर ४१ इतर हरकती आल्या आहेत. ३५ दुबार ठरावांवर मंगळवार व बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. बुधवारी १९ दूध संस्थांच्या दुबार ठरावांवर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी सुनावणी घेऊन संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले. संघाच्या ठरावाला लाखमोलाची किंमत असल्याने प्रतिनिधीच्या नावासाठी संस्थांतर्गत संघर्ष उफाळून येतो. त्यातूनच ८ ठरावधारकांनी आपापसात समझोता करून हरकत मागे घेतली. उर्वरित हरकतीमध्ये संचालक मंडळाची संख्या समसमान आहे, मात्र सचिवाने आपल्या मर्जीतील गटाकडे वजन टाकल्याने पेच निर्माण झाला आहे. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष व सचिवांनी ठराव केला, मात्र ते अल्पमतात आहेत, अशा तक्रारी सुनावणीदरम्यान समोर आल्या.

कागल व शाहुवाडी तालुक्यातील दोन संस्थांनी तर चक्क दोन अध्यक्ष, दोन सचिव आणि दोन प्रोसेडिंगच हजर केल्याने अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला. दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेतले आहे. आज, गुरुवारी सकाळी साडेअकरापासून इतर ४१ हरकतींवर सुनावणी होणार असून ८ मार्चला सर्व हरकतींवर निकाल दिला जाणार आहे.