शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अलोट गर्दीत बालचित्रपट महोत्सव सुरू

By admin | Updated: February 16, 2017 00:00 IST

उदंड प्रतिसाद : चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजन

कोल्हापूर : जगभरातील दर्जेदार कलाकृतींची मेजवानी असलेल्या दुसऱ्या बालचित्रपट महोत्सवास बालगोपालांच्या अपूर्व उत्साह व उदंड प्रतिसादात बुधवारी प्रारंभ झाला.येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेता प्रियदर्शन जाधव यांच्या हस्ते उपस्थितांसोबत सेल्फी घेऊन झाले. यावेळी ‘आम्ही असू लाडके’ चित्रपटातील प्राजक्ता पाटील, गणेश जोशी, वन्या करकरे, आदी कलाकार उपस्थित होते.यावेळी अभिनेता जाधव यांनी उपस्थित बालचमूंना आपल्या चित्रपट क्षेत्रातील प्रवासाबद्दल माहिती सांगितली. ते म्हणाले, चित्रपट हे चांगला माणूस घडविण्याचे माध्यम आहे. सध्याच्या मुलांच्या ते अधिक जवळ असल्याने यातून उद्याचे चांगले नागरिक घडतील. समाजातील वंचित घटकांसाठी बालचित्रपट महोत्सव हा चिल्लर पार्टीचा चांगला उपक्रम आहे. पुढील महोत्सवासाठी मुंबईहून पाच निर्माते आपले सिनेमे घेऊन येतील, यासाठी प्रयत्न करीन. उद्घाटनानंतर महोत्सवात ‘द क्रुड्स’ ही ओपनिंग फिल्म दाखविण्यात आली. अश्मयुगात राहणारा मानव निसर्गासोबत स्वत:ला जमवून घेत प्रगत झाला व त्याने काही नियम तयार केले; पण क्रुड्स फॅमिलीतील एक अवखळ मुलगी या नियमांच्या चाकोरीबाहेर जाऊन जगण्याचा प्रयत्न करते. यामुळे नवीन संकटे उभी राहतात व त्यावर ती कशी मात करते, यावर ‘द क्रुड्स’मधून प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यानंतर हॉलिवूड, टेक्सास, काऊबॉय आणि क्लिंट ईस्टवूड या समीकरणाच्या अ‍ॅनिमेशन अवतारावर आधारलेला ‘रॅँगो’ हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यानंतर जगण्याचे नियम जो पाळतो तो जगतो व जो नियम मोडतो त्याचा नाश होतो, अशा आशयावर आधारित मानवी हस्तक्षेपामुळे जंगली प्राण्यांवर होणारा परिणाम यामधून दाखविण्यात आला. आज, गुरुवारी महोत्सवाचा शेवटचा दिवस असून, या बालचित्रपट महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजक मिलिंद यादव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)४आज, गुरुवारी दुपारी दोन वाजता या बालचित्रपट महोत्सवाचा समारोप होत असून, त्यासाठी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील बालकलाकार प्रणव सूर्यवंशी, आर्यन पाटल, सुशांत कुरुंदवाडे, सिद्धार्थ कांबळे उपस्थित राहणार आहेत. आजचे चित्रपट : गॉड मस्ट बी क्रेझी (सकाळी ९ वा), लिजंड आॅफ दि गार्डियन्स (दुपारी १२ वा), ग्रॅव्हिटी (दुपारी ३ वा.)