शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला परवानगी द्या

By admin | Updated: April 29, 2016 00:37 IST

केंद्रीय मंत्र्यांची ‘पुरातत्त्व’ला सूचना : धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामाबाबत नागरिकांतून उद्रेक होत असतानाच खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्ली येथे पुरातत्त्व खात्याचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी मंत्री शर्मा यांनी पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून पुलाच्या बांधकामाला परवानगी देण्याबाबत सूचना केल्या. तसेच महिन्याभरात या पर्यायी पुलाच्या बांधकामाबाबत पुरातत्त्व खात्याकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल, असेही त्यांनी अभिवचन दिले. त्यामुळे हा नवा पर्यायी शिवाजी पूल लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.शिवाजी पुलाला समांतर असलेल्या नव्या पुलाचे बांधकाम ८० टक्के पूर्ण होऊनही काही महिने काम रखडले आहे. पुलाच्या बांधकामामध्ये अडथळा ठरणारा शाहूकालीन हौद आणि पुरातत्त्व खात्याचे ब्रह्मपुरी परिसरात लागू असलेले निर्बंध, यामुळे पुरातत्त्व खात्याकडून ना हरकत दाखला मिळाला नसल्यामुळे पुलाचे बांधकाम ‘जैसे थे’ आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी पुरातत्त्व खात्याचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची भेट घेवून नियमानुसार बांधकामाला परवानगी देणे शक्य नसले तरी जनहितार्थ मुद्यावर खास बाब म्हणून नव्या पर्यायी पुलाला पुरातत्त्व खात्याने परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यानुसार मंत्री शर्मा यांनी, पुरातत्त्व खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुलाच्या बांधकामाला परवानगी देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे कोल्हापूर ते पन्हाळा या मार्गावरील शहरालगतच्या नव्या पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला पुरातत्त्व खात्याकडून निश्चितच ना हरकत प्रमाणपत्र महिन्याभरात मिळेल, असे अभिवचन मंत्री शर्मा यांनी यावेळी खासदार महाडिक यांना दिले. कोल्हापूर ते पन्हाळा रस्त्यावरील वाढलेली वाहतूक, सध्याच्या शिवाजी पुलाचे शंभर वर्षांहून अधिक झालेले आयुर्मान आणि जनभावना लक्षात घेऊन हा पूल लवकरात-लवकर पूर्ण व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही खासदार महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे.