शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘रायगडावरील राजसदरेवर जाण्यासाठी परवानगी द्या’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 06:10 IST

Raigad News : पावसाळा व लॉकडाऊननंतर रायगड विकास प्राधिकरणाची सर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. चित्त दरवाजा ते महादरवाजा मार्गाच्या उर्वरित पायऱ्यांचे बांधकाम, संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे.

 कोल्हापूर : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून आणि बाहेरूनही अनेक शिवभक्त येत असतात. मात्र, सध्या या ठिकाणी अनेक कामे सुरू असल्यामुळे त्यांना राजसदरेवर जाऊ दिले जात नाही. परंतु, काही नियम करून त्यांना राजसदरेवर जाण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी आपण केल्याची माहिती खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी दिली.संभाजीराजे म्हणाले, पावसाळा व लॉकडाऊननंतर रायगड विकास प्राधिकरणाची सर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. चित्त दरवाजा ते महादरवाजा मार्गाच्या उर्वरित पायऱ्यांचे बांधकाम, संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे. चित्त दरवाजाच्या प्रदर्शनीय भागाचे काम प्राधिकरणामार्फत चुना, दगड, सुर्खी व बेलफळ या पारंपरिक बांधकाम साहित्याने पूर्ण झाले आहे.काही दिवसांपूर्वी पुरातत्त्व विभागाने चित्त दरवाजा येथे तात्पुरत्या स्वरूपात तिकीट खिडकी सुरू केली आहे. या खिडकीच्या दृश्य स्वरूपाबद्दल शिवभक्त व पर्यटकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. याबाबत पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांना माहिती देण्यात आली आहे. खिडकीचे दृश्य स्वरूप ऐतिहासिक पद्धतीचेच असावे, अशा सूचनाही केल्या आहेत.राजसदरेवर लावलेले बॅरिकेड्स तत्काळ काढावेत यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, अद्याप त्याबाबत उत्तर मिळाले नसल्याचे सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती