शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

धर्मांधता, भांडवलशाहीची देशात युती

By admin | Updated: March 5, 2015 00:45 IST

बी. जी. कोळसे-पाटील : गडहिंग्लज येथे राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प

गडहिंग्लज : देशात राजकारण राहिलेलेच नाही. टोळभैरवांची भांडवलदारांच्या इशाऱ्यावर नाचणारी टोळीच शिल्लक राहिली आहे. त्यामुळे धर्मांधता आणि भांडवलशाहीची युतीच देश चालवत असल्याचा घणाघाती आरोप उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केला.येथील नगरपरिषदेच्या प्रांगणात श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील अखेरचे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष अकबर मुल्ला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.‘राजकारणातील बदलते प्रवाह’ याविषयावर बोलताना कोळसे-पाटील यांनी शब्दप्रामाण्यवाद्यांनी समाजातला बुद्धी प्रामाण्यवाद का आणि कसा संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे, याचा लेखाजोखा मांडला. मीडिया, न्यायव्यवस्था आणि प्रशासन या लोकशाहीच्या तिन्ही खाबांचे पाठबळ शब्दप्रामाण्यवाद्यांना मिळत आहे. त्या जोरावर हे समाजाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या माणसाला मारत आहेत. मूठभर असले तरी भयानक आहेत; पण त्यांच्या हिंसेला अहिंसेने, शब्दाला बुद्धीने उत्तर देण्यासाठी आता समाजाने ‘डोळस’ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांनी स्वागत केले. कॉ. आय. सी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अकबर मुल्ला, सुभाष धुमे, आदींनी मनोगत व्यक्त केले. कॉ. उज्ज्वला दळवी यांनी आभार मानले. (वार्ताहर)पानसरेंना आताच का मारले ?२६/११ च्या हल्ल्याचे आणि शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूविषयी गूढ उकलण्याचे आणि वस्तुस्थिती समाजासमोर आणण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात ३० डिसेंबरला केशवराव भोसले नाट्यगृहात सभा घेतली. राज्यभर सभा घेण्याचा त्यांनी केलेला निर्धार व त्याला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद २६/११ च्या कटामागील धर्मांध शक्तींना मान्य नव्हता. त्यातूनच पानसरेंची हत्या झाल्याचा आरोप कोळसे-पाटील यांनी जाहीर सभेत केला.