शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : मातब्बर उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 13:40 IST

विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघांतून ६६ उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी ९४ अर्ज दाखल केले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. नवरात्रौत्सवातील पाचवी माळ असल्याने बहुतांश उमेदवारांनी मुहूर्तावर अर्ज दाखल केले. १० पैकी पाच मतदारसंघांत युतीला बंडखोरीचा सामना करावा लागेल, असे आजचे चित्र आहे.

ठळक मुद्देमातब्बर उमेदवारांचे अर्ज दाखल पाच मतदारसंघांत युतीला बंडखोरीचा सामना

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघांतून ६६ उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी ९४ अर्ज दाखल केले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. नवरात्रौत्सवातील पाचवी माळ असल्याने बहुतांश उमेदवारांनी मुहूर्तावर अर्ज दाखल केले. १० पैकी पाच मतदारसंघांत युतीला बंडखोरीचा सामना करावा लागेल, असे आजचे चित्र आहे.अर्ज दाखल केलेल्यांत आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री विनय कोरे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, स्वाभिमानी पक्षाकडून अनिल मादनाईक, संग्राम कुपेकर यांच्यासह कागलमधून भाजपच्या समरजित घाटगे यांनी, तर चंदगडमधून गोपाळराव पाटील यांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांनी सायकलवरून जाऊन अर्ज दाखल केला.अर्ज दाखल करताना अनेकांनी हजारो लोकांना रस्त्यांवर आणून शक्तिप्रदर्शन केले. हलगीचा कडकडाट, उमेदवारांचा जयजयकार, मोटारसायकल रॅली, फडफडणारे राजकीय पक्षांचे झेंडे यांमुळे सगळीकडे वातावरण राजकारणमय बनून गेले होते. कागल मतदारसंघात प्रमुख तीन उमेदवारांनी एकाच दिवशी अर्ज दाखल केल्याने तिथे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली. एकाच वेळी नवरात्रौत्सवासाठी आलेले भाविक आणि अर्ज दाखल करण्यासाठी जमलेले कार्यकर्ते यांमुळे शहर फुलून गेले. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक