शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ; नागरिकांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 19:34 IST

CoronaVirus Ichlkarnji Kolhapur- महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची शहरात बुधवारी कडक अंमलबजावणी करण्यात आली. पोलिस आणि नगरपालिकाा प्रशासन यांच्यावतीने संयुक्त मोहीम राबवून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या. दरम्यान, कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाल्याने व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

ठळक मुद्देइचलकरंजीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद व्यापाऱ्यांकडून नाराजी; नागरिकांमध्ये भीती

इचलकरंजी : महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची शहरात बुधवारी कडक अंमलबजावणी करण्यात आली. पोलिस आणि नगरपालिकाा प्रशासन यांच्यावतीने संयुक्त मोहीम राबवून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या. दरम्यान, कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाल्याने व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार पोलिसांनी शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून कारवाई करण्यास सुरुवात केली. के.एल. मलाबादे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, छत्रपती शाहू महाराज पुतळा ते कबनूर मार्गावरील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद केली. त्यानंतर शहरातील सर्वच मुख्य मार्गांवर कारवाई सुरू झाल्याने धावपळ करत व्यापाऱ्यांनी आपली आस्थापना बंद केली.पथकाने नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करत दंड वसूल केला. नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील व पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी ही कारवाई केली. अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी नागरिकांची तारांबळ उडाली.नियम न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर तसेच मास्क न वापरणे, ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवरही दंडाची कारवाई केली. यावेळी व्यापारी व पोलीस यांच्यामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता, दुकाने कशी काय बंद करता, असा सवाल व्यापाºयांनी उपस्थित केला. पोलिसांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत असल्याचे सांगत कारवाई सुरूच ठेवली. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्थामहाराष्ट्र शासनाने कोरोनासंदर्भात जाहीर केलेल्या नियमावलीनुसार व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. मात्र, पोलिसांनी अचानक दुकाने बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पोलिसांच्या कारवाईनंतर दुकाने बंद करण्यात आली. कोणती दुकाने सुरू ठेवावीत व कोणती बंद ठेवावीत, यावरून संभ्रम निर्माण झाला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर