शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हाळवणकरांना सभापती निवडीचे सर्वाधिकार

By admin | Updated: January 6, 2017 00:17 IST

‘भाजप’चा निर्णय : समित्यांची आज निवड

इचलकरंजी : येथील नगरपालिकेतील विविध विषय समित्यांची निवडणूक आज, शुक्रवारी होत असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ भाजपची बैठक गुरुवारी झाली. भाजपच्या शहर कार्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये त्यांच्या वाट्याला आलेल्या तीन समित्यांच्या सभापती निवडीचे अधिकार आमदार सुरेश हाळवणकर यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.येथील नगरपालिकेमध्ये भाजप, ताराराणी आघाडी व राष्ट्रवादी अशी युती सत्तेत आहे. नगरपालिकेतील विविध विषय समित्यांमध्ये बांधकाम व पाणीपुरवठा समिती राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे जाणार असून, ताराराणी आघाडीकडे उपनगराध्यक्षपद आहे. भाजपच्या अ‍ॅड. अलका स्वामी नगराध्यक्ष आहेत, तर महिला व बालकल्याण, आरोग्य व स्वच्छता आणि शिक्षण या तीन समित्या भाजपकडे आहेत. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी भाजपच्या नगरसेवकांची बैठक पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी आयोजित केली होती. यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगरसेवक अजित जाधव उपस्थित होते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी शहर कॉँग्रेस समितीत कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कॉँग्रेस नगरसेवकांची व शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी आयोजित केलेल्या आघाडीच्या नगरसेवकांची बैठक मदन कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकींत त्यांच्या पक्षाला मिळालेल्या कोटानिहाय नगरसेवकांच्या संख्येनुसार पाच समित्यांवर सदस्यांची नावे देण्याचे ठरविले. (प्रतिनिधी)अपक्ष दोन नगरसेवकांच्या समावेशाविषयी उत्सुकतापालिकेतील एकूण ६२पैकी ६० नगरसेवकांना विविध विषय समित्यांवर सदस्यत्व मिळते. मात्र, मदन झोरे व सुनीता बेडक्याळे हे दोन नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांना समितीमध्ये वर्णी लागण्यासाठी सभाध्यक्ष प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. त्यांच्या मागणीची दखल प्रांताधिकारी यांच्याकडून घेतली जाणार का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.