शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सर्व खासदारांना शाहू गौरव ग्रंथाची भेट; राजर्षी शाहूंना ‘भारतरत्न’ मागणीसाठी पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:56 IST

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी आग्रही मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय ...

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी आग्रही मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी संसदेचे लक्ष वेधले होते. या मागणीचा पाठपुरावा म्हणून खासदार महाडिक यांनी देशातील सर्व खासदारांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित गौरव ग्रंथ भेट म्हणून पाठविला आहे. देशातील सर्वच खासदारांनी राजर्षी शाहंूचे चरित्र वाचावे आणि या महान लोकराजाला भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली आहे.दिवाळीचे औचित्य साधून खासदार धनंजय महाडिक यांनी देशभरातील सर्व खासदारांना एक अनोखी भेट दिली आहे. ही भेट कोल्हापूरचे दैवत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेला चरित्र ग्रंथ होय. हा ग्रंथ वाचल्यानंतर सर्व खासदार राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहितील आणि त्यातून मागणी पूर्णत्वास जाईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी यापूर्वीच केली आहे. त्यासाठी त्यांनी संसदेतही हा मुद्दा उपस्थित केला, तर कोल्हापुरातील विविध व्यक्ती, संस्था यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून राजर्षी शाहूंना ‘भारतरत्न’ देण्याबाबत विनंती करावी, असे आवाहन केले होते. त्याचा पाठपुरावा म्हणून महाडिक यांनी सर्व खासदारांना शाहू चरित्र ग्रंथ भेट म्हणून पाठविला आहे.