शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात उद्यापासून लॉकडाउन, बँकांसह 'या' गोष्टी राहणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 19:27 IST

कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून पासून सात दिवस १०० टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागातील उद्योग आस्थापना मध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.

ठळक मुद्देउद्योगांमधील कर्मचारी क्षमता 50 टक्के; दुधसंकलन व वाहतुकीस वेळ मर्यादा नाहीजिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांचे सुधारित आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यात उद्यापासून पासून सात दिवस १०० टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागातील उद्योग आस्थापना मध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.

त्या बरोबर दूध संकलन व वाहतुकीसाठी वेळेची मर्यादा असणार नाही. या बाबतचा सुधारित आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला आहे.जिल्हादंडाधिकारी यांनी आज जाहीर केलेल्या सुधारित आदेशानुसार सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादीत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील तसेच बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सीची कामे सुरु राहतील.

दुध संकलन व वाहतूक सुरु राहील (वेळेची मर्यादा नाही) आणि ग्रामीण भागातील एमआयडीसी किंवा खाजगी किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीतील सर्व औद्योगिक आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर