शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

पूरग्रस्त आक्रोश मोर्चा : दोघांनी घेतली नृसिंहवाडी येथील पंचगंगा पुलावरून उडी; बचाव पथकामुळे अनर्थ टळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 17:48 IST

शेतकरी वाचलाच पाहिजे, राजू शेट्टींना बळ दिलेच पाहिजे, अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होत्या.

ठळक मुद्देशेतकरी वाचलाच पाहिजे, राजू शेट्टींना बळ दिलेच पाहिजे, अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होत्या.

नसिम सनदी-आदित्य वेल्हाळकुरुंदवाड : माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढलेल्या पूरग्रस्त आक्रोश मोर्चात रविवारी सायंकाळी एकाने नृसिंहवाडी येथील पंचगंगा पुलावरून उडी घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे पुलावर बंदोबस्त पाहणीसाठी आले होते. त्यांच्या समोरच उडी घेतल्याने एकच गोंधळ उडाला. त्याला बचाव पथकानं तात्काळ बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान हा उडी मारणारा कोण याची स्वाभिमानाच्या कोणत्याच नेत्याला माहित नव्हती. शेट्टी यांचा आदेश येईपर्यंत कोणीही कोणती पावलं उचलू नये असे पुकारण्याची वेळ नेत्यांवर आली. त्यानंतर आणखी एका व्यक्तीनं पुलावरून उडी घेतली. परंतु बचाव पथकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

पुराचा लोंढा दिसावा तसा लोकांचा पूर यात्रेच्या मार्गावर दिसत होता. नृसिहवाडी जवळ येईल तशी गर्दी वाढत होती. कुरुंदवाडमध्ये तर रस्ते तुडुंब भरून वाहत होते. शेतकरी वाचलाच पाहिजे, राजू शेट्टींना बळ दिलेच पाहिजे अशा घोषणा त्या ठिकाणी केल्या जात होत्या.कुरुंदवाड मध्ये सभा"प्रयाग चिखली पासून मोर्चाला सुरुवात केल्यापासून हजारो आया बहिणींनी माझे औक्षण केले. यावेळी माझ्या कपाळाला कुंकू लावलेल्या ठिकाणी जखम झाली आहे. पण या जखमेचे दुःख नाही ही जखम कधीतरी भरून येईल. पण मला हे भाग्य लाभले त्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो," अशी भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

प्रचंड जल्लोष...एकसारखी वाजणारी हलगी, डफ आणि टाळ, घुमणारे ढोल, फुटणाऱ्या फटाक्याच्या माळा आणि दिल्या जाणाऱ्या घोषणा आणि स्वागतासाठी उधळली जाणारी फुले, पायावर घातले जाणारे पाणी असे वातावरण पाहता आक्रोश कमी आणि जल्लोष जास्त दिसत होता. अक्षरशः फटाके लावून संगीताच्या तालावर लोक थिरकत होते. वाजणाऱ्या शिट्या आणि लोक तर हार बुके घेऊन स्वागत करताना दिसत होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीfloodपूर