शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

हिंमत असेल निवडणुकीला उभारून दाखवा, मेघराज राजेभोसलेंचे विरोधकांना आव्हान

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: September 14, 2022 19:16 IST

मी पून्हा अध्यक्ष होण्यास पात्र आहे की नाही हे सभासद ठरवतील, या निवडणुकीत पॅनेलचे सगळे १७ उमेदवार निवडून नाही आणले तर मी अध्यक्ष होणार नाही.

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षात चित्रपट महामंडळात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. ५ वर्षात १२ कोटींच्या ठेवी, तीन कार्यालये, कोरोनात सभासदांना मदत या गोष्टी अशाच झालेल्या नाहीत. त्यामुळे मी पून्हा अध्यक्ष होण्यास पात्र आहे की नाही हे सभासद ठरवतील, या निवडणुकीत पॅनेलचे सगळे १७ उमेदवार निवडून नाही आणले तर मी अध्यक्ष होणार नाही. हिंमत असेल त्यांनी उभारून दाखवावे असे आव्हान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी बुधवारी विरोधकांना दिले.महामंडळातील अंतर्गत राजकारणावर कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत यावर ते म्हणाले, उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची गुणगाणी सगळ्यांनी पाहिली व ऐकली आहेत त्यांनी केलेल्या आरोपांना मी कचऱ्याची टोपली दाखवतो.

कोरोना संपल्यानंतर वारंवार कार्यवाह सुशांत शेलार यांना सांगूनही त्यांनी कार्यकारिणीची बैठक लावली नाही. दोनवेळा फक्त अध्यक्ष बदलाची चर्चा झाली. खरेतर उपाध्यक्ष धनाजी यमकर, बाळा जाधव यांना बँकेच्या माध्यमातून पैसे हडप करायचे होते तो डाव मी उधळला, महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांना मी हवा होतो आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पद हवे आहे. बँकेची खाती गोठवली म्हणून मी त्यांना नको आहे. सभासदांमधील गोंधळाचे वातावरण दूर व्हावे यासाठी निवडणूक जाहीर केली आहे. गेल्या तीन वर्षातील ऑडीट सुशांत शेलार यांच्या सहीनेच सादर झाले आहेत. यावर्षीचे ऑडीट सुरू आहे. भ्रष्टाचार झाला वाटत असेल तर संबंधितांनी स्वखर्चातून करून घ्यावे.ज्या व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले आहे, त्यांची सविस्तर उत्तरे मी दिली आहेत. बाळा जाधव यांनी कलाकाराचे सभासदत्व बदलून दुय्यम कामगार करून घेतले व पदाधिकारी झाले घटनेत हे मान्य नसताना सभासदांची दिशाभूल केली, ते कायद्याने महामंडळाचे सभासद नाहीत, सर्वसाधारण सभेत कागदपत्रे फेकली, कार्यवाह पदाचा राजीनामा दिला नंतर बेकायदेशीररित्या हेच पद घेतले. त्यांनी व धनाजी यमकर यांनी कोल्हापूर कार्यालय बंद पाडले, यमकर यांनी २ लाखांचा अपहार करण्याचा प्रयत्न केला. दाऊ पिऊन गोंधळ घातला. सुशांत शेलार यांनी खासगी बिलं महामंडळाच्या खात्यातून वसूल करण्याचा प्रयत्न केला. मुदत संपल्यानंतर स्वत:ला अध्यक्ष घोषित केले, हे घटनेनुसार बेकायदेशीर आहे. या सगळ्यांच्या आणखीही गोष्टी पुराव्यांसह आहेत त्या योग्यवेळी बाहेर काढले जाईल. यावेळी संजय ठुबे, आकाराम पाटील, अजूर्न नलावडे, सुरेंद्र पन्हाळकर यांच्यासह चित्रपट महामंडळाचे सभासद उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर