एक एप्रिलपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील तपासणीला सुरुवात झाली. आजपर्यंत स्वॅब दिलेल्या ६३६७ पैकी १८४१ जण पॉझिटिव्ह असून, १३६२ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर ४१९ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाने दुसऱ्या लाटेत ६० जणांचा मृत्यू झाला आहे. आज आजरा ११, पेद्रेवाडी ३, कागिनवाडी ३, भादवण ९, चाफवडे ३, उत्तूर ८, बहिरेवाडी ८, गजरगाव ३, मलिग्रे ३, सोहाळे २, मडिलगे २, साळगाव २, सरोळी ३, हाळोली २, कोवाडे ३, पोळगाव ३, मुमेवाडी, खेडे, पेरणोली, मुंगूसवाडी, धामणे, मसोली, हरपवडे, वाटंगी, माद्याळ ठिकाणी प्रत्येकी १ असे ७७ जण कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आजरा तालुक्यात ७७ जण कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:18 IST