शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कातोलीतून ‘अजित’, तर कळेतून संदीप

By admin | Updated: January 31, 2017 23:03 IST

नरके बंधू मैदानात उतरणार : दोन्ही ठिकाणी बंडोबामुळे डोकेदुखी

विक्रम पाटील-- करंजफेण -गेली २० वर्षे आरक्षित असलेला कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघ यावर्षी सर्वसाधारण पुरुष गटासाठी खुला झाल्याने इच्छुकांनी ‘अभी नही तो कभी नही’ अशी भूमिका घेतली आहे. आमदार नरके यांचे बंधू अजित नरके यांचे नाव कोतोलीसाठी नाव पुढे येत आहे. तर कळेतून काँग्रेसकडून संदीप नरकेंच्या नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, २०१२ साली या मतदारसंघावर आमदार सत्यजित पाटील गटाने जनसुराज्यशी काटा लढत देऊन वर्चस्व प्राप्त केले होते; परंतु याहीवर्षी जनसुराज्य व शिवसेना यांच्यात चुरशीची लढत होणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे; परंतु जनसुराज्यने भाजपशी संधान साधल्याने कोरे यांना सत्तेची ताकद मिळेल. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य के. एस. चौगले आपला उमेदवार रिंगणात उतरवतील, असे काही दिसत नाही. परंतु, सेनेच्या पाटील गटात इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे कोंडी झाली आहे. परवापर्यंत कोरे गटातून शंकर पाटील व सेनेकडून प्रकाश पाटील यांचे नाव पुढे असताना आमदार नरके यांचे बंधू अजित नरके यांचे सेनेतून नाव कोतोलीच्या उमेदवारीसाठी पुढे येऊ लागल्यामुळेच ते आपली राजकारणाची एंट्री कोतोलीतून करण्याचे नाकारता येत नाही. कोतोलीअंतर्गत बाजार भोगाव हा मतदारसंघ नरके यांचा बालेकिल्ला आहे. तसेच अध्यक्षपद खुले असल्याने अजित यांना तेथून उभे करण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह दिसत आहे.परंतु, सरूडकर गटाची उमेदवारीसाठी असणारी धडपड व कोतोलीतील स्थानिक उमेदवार प्रकाश पाटील यांना उमेदवारी नाकारल्यास स्थानिक मतदानावर फरक पडणार का? हा प्रश्न आहे. त्यातच सरूडकर घराण्याचे निष्ठावंत कार्यकर्ते व दत्त कारखान्याचे माजी संचालक दगडू पाटील हे माघार न घेण्याच्या बोलीवर उमेदवारी अर्ज भरणार असल्यामुळे पाटील गटाला डोकेदुखी ठरणार आहे.पाटील यांची उमेदवारी नाकारून नरके यांची उमेदवारी जाहीर झाल्यास प्रकाश पाटील काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री विनय कोरे आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी व गटाची ताकद वाढविण्यासाठी मागीलवेळी बंडखोरी केलेल्या उमेदवारांच्या संपर्कात असल्याचे समजते. कळेत पी. एन. पाटील यांची इच्छा असल्यास आपण कळे मतदारसंघातून लढणार असल्याचे संदीप नरके यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी आजपर्यंत तरी नक्की मानली जात आहे.तर कोरे मदत करणार का?माजी मंत्री कोरे यांनी कार्यकर्त्यांना पी. एन. यांना उघडपणे मदत करण्याचे आदेश दिले असले, तरी करवीरमधून ‘भाजप’चा उमेदवार असल्यास पी. एन. यांना प्रत्यक्ष कोरे यांच्याकडून मदत होणार का? हा प्रश्न कॉँग्रेस कार्यकर्त्यांना न सुटणारा आहे.दोन आजी आणि दोन माजीआमदारांच्या प्रतिष्ठेची लढतकोतोलीमधून अजित नरके यांना निवडून आणण्यासाठी विद्यमान आमदार सत्यजित पाटील, करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांची ताकद पणाला लागणार आहे. तर जनसुराज्यचे उमेदवार शंकर पाटील यांना निवडून आणण्यासाठी माजी मंत्री विनय कोरे व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची ताकद पणाला लागणार आहे.