शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Teachers Day: कोल्हापुरातील अंधशिक्षक अजय वणकुद्रे यांनी अंधविद्यार्थ्यांना दिली 'उमेद', तेरा वर्षांची तपश्चर्या 

By संदीप आडनाईक | Updated: September 5, 2024 13:11 IST

शेकडो विद्यार्थ्यांना दाखवली यशाची वाट 

संदीप आडनाईक कोल्हापूर : सामान्य विद्यार्थ्याला अनेकजण सहजपणे शिकवू शकतात परंतु स्वतः विकलांग असताना विद्यार्थ्यांना शिकवणे हे ध्येय उराशी बाळगून कोल्हापुरातील अजय वणकुद्रे या विशेष शिक्षकाने गेली तेरा वर्षे प्रचंड मेहनत करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना स्वतःसारखेच स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद दिली. आज त्यांचे हे विद्यार्थी भले मोठ्या पदावर नसतील परंतु आपला स्वतःचा संसार सांभाळण्यास समर्थ बनले आहेत. त्यामागे या अंध असलेल्या शिक्षकाची तपश्चर्या आहे. त्यांच्या ध्यासामुळे आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना यशाची वाट सापडली आहे. मूळचे सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथील वणकुद्रे यांचे वडील पीएसआय असल्यामुळे राज्यभर नोकरीसाठी फिरले. १९७८ मध्ये त्यांची बदली कोल्हापुरात झाली. तेव्हा त्यांनी जुना बुधवार पेठेत वास्तव्य केले, ते कुटुंब आज अखेर या जागेत राहत आहेत. अजय यांना दोन बहिणी आणि चार भाऊ.. येथील वास्तव्यात वडिलांचे त्याच वर्षी निधन झाले. साऱ्या जबाबदाऱ्या गृहिणी असलेल्या आईवर येऊन पडली. त्यांनी मुलांना शिकवून मोठे केले. लहानपणापासून हुशार असलेल्या अजयला शिकायचे होते, म्हणून त्याला बुरुड गल्लीतील राजश्री शाहू हायस्कूलमध्ये घातले. परंतु दहावीत असताना १९८० मध्ये टायफाईडमुळे ७० टक्के नजर गेली. शिक्षकांनी अंध मुलाला शिकवता येत नसल्याचे सांगून घरी राहायला सांगितले. त्यामुळे शिक्षण थांबले. दोन वर्षे उपचार घेतले पण दृष्टी परत येणार नाही हे समजल्यानंतर त्याला सामोरे जात खटपट करून धडपड्या अजयने बोर्डात जाऊन माहिती घेतली आणि १७ नंबर फॉर्म भरून परीक्षा दिली. त्यात ६० टक्के गुण मिळवले. पुढे नाईट कॉलेजमध्ये जाऊन अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. नुकतेच अंधत्व आल्याने हालचालीवर मर्यादा पडल्या. पण बारावीला रायटर घेऊन ५४ टक्के गुण मिळवले. याच काळात नॅब या संस्थेशी संपर्क आला. तेथे १२ वर्षे शिपाई म्हणून नोकरी केली, पण शिकण्याची उमेद शांत बसू देत नव्हती. नोकरी करत करत बीए पूर्ण केले.

बीएड झालेला पहिला दिव्यांग२००९ मध्ये इग्नो या दिल्लीच्या संस्थेत विशेष बीएड साठी प्रवेश मिळवला. दिल्लीत जाऊन प्रशिक्षण पूर्ण केले आणि २०११ मध्ये ७१ टक्के गुणांनी पदवी घेतली. पहिल्या सहा क्रमांकात अजय पाचवा होता आणि तोही एकमेव दिव्यांग. पुढे २०१५ मध्ये त्याने जॉर्ज या सॉफ्टवेअरच्या साह्याने एमएसआयटी परीक्षा उत्तीर्ण केली, तेव्हाही तो राज्यातील पहिला दिव्यांग ठरला.

शिक्षण संचालकांनी दिली संधीकोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या जागा निघाल्या तेव्हा २०१२ मध्ये अंध प्रवर्गात विशेष शिक्षकाची जागा मिळाली. तत्कालीन शिक्षण संचालकांनी अजयला विकास हायस्कूल मध्ये नेमणूक दिली. २०२० पर्यंत या पदावर अजयने काम केले. त्यानंतर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीकडे त्यांची विशेष युनिट मध्ये बदली केली. 

स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक कामनॅब, सक्षम, अंध युवक मंच, स्पर्श ज्योत फाऊंडेशन, अंध शाळा अशा स्वयंसेवी संस्थेमार्फत त्यांचे सामाजिक काम सुरू आहे.

हजारो दिव्यांगाना उभे केलेअजय यांनी आज पर्यंत १०० हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बहुजन समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची उमेद त्यांनी दिली आहे. 

लवटे सरांनी लाऊन दिले लग्नअंध व्यक्तीशी लग्न कोण करणार ही चिंता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी दूर केली. तत्कालीन जिल्हाधिकारी अजितकुमार जैन यांच्या उपस्थितीत १९९९ मध्ये बाल कल्याण संकुलातील अनाथ मुलीशी त्यांचा विवाह लाऊन दिला. पत्नीही ४० टक्के अपंग आहे. आज त्यांचा संसार सुखाचा आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या उत्तरदायित्वामधून ते मोकळे झाले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeachers Dayशिक्षक दिनStudentविद्यार्थी