शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘एआयएसएफ’चा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 16:18 IST

केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद या दोन्ही कायद्याला विरोध करत ते रद्द करावेत, या मागणीसाठी ‘एआयएसएफ’ व ‘एआयवायएफ’ या संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार निदर्शने करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘एआयएसएफ’चा मोर्चाजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

कोल्हापूर : केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद या दोन्ही कायद्याला विरोध करत ते रद्द करावेत, या मागणीसाठी ‘एआयएसएफ’ व ‘एआयवायएफ’ या संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार निदर्शने करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.सकाळी साडे अकराच्या सुमारास बिंदू चौक येथून गिरिष फोंडे, अतुल आंबी, शिवाजी माळी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. ‘नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद हे कायदे रद्द करा...’,‘मोदी-शहा मुर्दाबाद...’, ‘भाजप सरकार चलेजाव...’,‘इन्कलाब झिंदाबाद...’अशा घोषणा देत आंदोलकांनी मोर्चा मार्ग दणाणून सोडला. लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.

या ठिकाणी आंदोलकांनी जोरदार घोषणा देत तीव्र निदर्शने केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), आलॅ इंडिया युथ फेडरेशन (एआयवायएफ) च्या कार्यकर्त्यांसह नेहरु महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे की, लोकसभेतील पाशवी बहुमताच्या जोरावर राज्यसभेतील जेमतेम जोरावर गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने ‘नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद’ हे दोन्ही कायदे संमत करण्यात आले. त्याला देशभरातून विरोध सुरु झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना पोलीसांकडून मारहाण केली आहे.

या अमानुष छळाचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे हे दोन्ही कायदे त्वरीत मागे घेऊन विद्यार्थी व नागरिकांना झालेल्या मारहाणीची चौकशी करुन संबंधितांना शिक्षा करावी. अन्यथा देशभर आंदोलनाची व्यापकता वाढविली जाईल. आंदोलनात जावेद तांबोळी, आरती रेडेकर, धीरज कठारे, अरबाज पठाण, दिलदार मुजावर, कृष्णा पानसे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर