शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

इच्छाशक्तीमुळेच उभारला जलसेतू

By admin | Updated: January 2, 2015 21:55 IST

प्रमोद कामत : शेर्लेवासीयांनी बांधला तेरेखोल नदीपात्रावर बंधारा

बांदा : गावाने एकजूट दाखविल्यास कोणतेही काम सहजशक्य होऊ शकते, हे शेर्लेवासीयांनी दाखवून दिले आहे. शेर्ले ग्रामस्थांनी इच्छाशक्तीच्या जोरावरच तेरेखोल नदीपात्रात जलसेतू उभारून शेर्लेवासीयांचे स्वप्न साकार केले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत यांनी शेर्ले येथे केले.शेर्ले ग्रामस्थांनी तेरेखोल नदीपात्रावर श्रमदानाने बांधलेल्या जलसेतूच्या उद्घाटन समारंभात कामत बोलत होते. यावेळी शेर्लेचे माजी सरपंच युसुफखान बिजली यांच्या हस्ते फीत कापून जलसेतूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेर्ले सरपंच उदय धुरी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, शितल राऊळ, श्रीकृष्ण काणेकर, उन्नती धुरी, गुरुनाथ सावंत, डेगवे उपसरपंच मधुकर देसाई, प्रवीण देसाई, अन्वर खान, राजन कळंगुटकर, जगन्नाथ धुरी, हनुमंत आळवे, व्यापारी संघ अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, सचिव सचिन नाटेकर, मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर, श्यामकांत काणेकर, आदी उपस्थित होते. बिजली यांनी या नदीपात्रावर पूल होण्याचे स्वप्न बघितले होते. मात्र, शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे या पुलाचा प्रश्न रखडला होता. अखेर शेर्लेवासीयांनीच श्रमदानाने बंधारा उभारला. प्रमोद कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी सरपंच उदय धुरी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी एकनाथ धुरी, पोलीस पाटील विश्राम जाधव, रवी आमडोसकर, दयानंद धुरी, भिकाजी धुरी, शेर्ले व्यापारी संघाचे अध्यक्ष कमलाकर नेवगी, जयवंत धुरी, संदेश पावसकर, शेखर गोवेकर, श्रीपाद पणशीकर, शशिकांत मळेवाडकर, लक्ष्मण जाधव, नंदू कल्याणकर, राजेश चव्हाण, अरुण धुरी, अजित शेर्लेकर, आनंद चव्हाण, आना धुरी, दीपक गोवेकर, अमित गोवेकर यांच्यासह शेर्ले व बांदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेरेखोल नदीपात्रावर बंधारा बांधण्यात आल्याने स्थानिकांतून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)