शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पाच वर्षे रखडलेल्या अहिल्याबाई होळकर पुरस्कारांची अखेर घोषणा, सरकारला आली जाग

By विश्वास पाटील | Updated: March 4, 2023 13:07 IST

तब्बल ७८ पुरस्कारांची घोषणा

विश्वास पाटील  कोल्हापूर : पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवून विसरून गेल्यानंतर आता राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने राज्यभरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले. मागील पाच वर्षांच्या राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील तब्बल ७८ पुरस्कारांची घोषणा केली. गंमत म्हणजे आता २०१५-१६ ते २०१९-२० पर्यंतच्या पाच वर्षांची घोषणा झाली आहे.महिला व बाल विकासाच्या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या महिलांना व संस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी व त्यांच्या कामाला राजमान्यता मिळावी या चांगल्या हेतूने हे पुरस्कार खरेतर प्रतिवर्षी दिले जायला हवेत. परंतु, त्याकडे सरकारी पातळीवर फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. प्रस्ताव दाखल करण्यापासून त्यात राजकीय वशिलेबाजी जोरात होते. कांहीवेळा तरी मागील वर्षाच्या पुरस्कार विजेत्या महिलेचा प्रस्ताव घेऊन त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या महिला कार्यकर्तीचे नाव घालून सादर करण्याचे प्रकार घडले आहेत.

त्यामुळे चांगले काम करणाऱ्या महिला या पुरस्कारांकडे फारशा वळत नाहीत. जे प्रस्ताव सादर होतात त्यांचेही मूल्यमापन नीट करून त्यांची घोषणा वेळच्या वेळी केली जात नसल्यानेच २०१५-१६ पासूनचे प्रस्ताव धूळ खात पडले होते. आता पुरस्कारांची घोषणा तरी झाली; परंतु त्याचे वितरण कधी होणार याबद्दलही शासनाने स्पष्ट केलेले नाही.

राज्यस्तरीय पुरस्कार : हर्षदा विद्याधर काकडे (शेवगांव, अहमदनगर), वनमाला परशराम पेंढारकर मंगरुळपीर (वाशिम), शोभा गुंडप्पा पारशेट्टी (शिवाजी चौक लातूर), रजनी शामराव मोरे (तुकुम. चंद्रपूर)- २०१९-२० ला प्रस्ताव नाही.

विभागस्तर : (ज्या वर्षी प्रस्ताव आले त्याच वर्षाची घोषणा).पुणे : शिशू आधार केंद्र कोल्हापूर, शिवाजीराव पाटील संस्था सैनिक टाकळीकोकण विभाग : वनवासी संघ, उसरोली, मुरूड, सहेली ग्रुप चिपळूण, आश्रय फाऊंडेशन पनवेलनाशिक : यमुनाबाई महिला मंडळ, धुळे, चिराईदेवी अर्थे, ता. शिरपूर, स्नेहालय अहमदनगरअमरावती : छत्रपती शिवाजी वेल्फेअर सोसायटी मूर्तीजापूरऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुरल संस्था कुरुदा ता. वसमत

जिल्हास्तरकोल्हापूर : डॉ. स्वाती काळे, बुधवार पेठ कोल्हापूर, डॉ. अंजना जाधव पेठवडगांवसांगली : शोभाताई होनमाने देवराष्ट्रे, सविता डांगे, उरुण, इस्लामपूर, डॉ. निर्मला पाटील, शिवाजीनगर सांगली.रत्नागिरी : प्रा. बीना कळंबटे मांडवी रत्नागिरी, सुरेखा गांगण चांदेराई रत्नागिरी, आसावरी शेट्ये शिरगांव.सातारा व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून पाच वर्षांत प्रस्तावच नाही.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार एक लाख रुपयांचा आहे. विभागीय स्तरावरील पुरस्कार २५ हजार रुपये आणि जिल्हा स्तरावरील १० हजार रुपयांचा आहे. त्याशिवाय सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रही देण्यात येते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर