कोल्हापूर : कुरुंदवाड परिसरातील शेतकरी आणि विकास सेवा संस्थांतर्फे कृषी सहायक सीमा घनश्याम दिवटे-खारकांडे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांच्या हस्ते हा सत्कार झाला. कुरुंदवाडमधील डॉ. आपासो ऊर्फ सा. रे. पाटील सभागृहात कार्यक्रम झाला.
सन २०१९ व २०२१ च्या महापूर परिस्थितीत दिवटे यांनी चांगले काम केले. याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, धनपाल आलासे, रामचंद्र मोहिते, साताप्पा बागडी, रमेश भुजुगडे, कालगोंडा पोमजे, चंद्रकांत जोंग, उदय डांगे, आर.एम. राजमाने, निरंजन देसाई, एस. जी. कांबळे, आकांशा ढेरे, अबोली भोकरे, वैदेही पाटील, संदीप गावडे यांच्यासह शेतकरी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.
फोटो : २३०९२०२१-कोल- सत्कार
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमध्ये कृषी सहायक सीमा घनश्याम दिवटे-खारकांडे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार झाला. या वेळी विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.