कोल्हापूर: पुणे बंगलोर महामार्गावर रात्री 1.45 च्या सुमारास दोन आंदोलनकर्त्यांनी महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना याची माहिती मिळताच साधारण एक तासाने त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडून दिले.कोल्हापूर मराठा समाजातर्फे उद्या (गुरुवार )शहर व जिल्हा बंदचे आवाहन जाहीर करणयात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे-बंगलोर हायवेवर पंचगगा नदी पुलावर हातात शिवरायांचा भगवा ध्वज घेऊन एक कार्यकर्ता वाहने अडविण्याचा प्रयत्न करीत होता, तर अन्य साथीदारानं हायवेवर दगड, लोखंड, झाडाच्या फांदी तोडून टाकत होता. त्यातच रिमझिम पाऊस व अडवलेल्या रस्त्यामुळे वाहनचालक गोंधळून जात होते. आणखी काही कार्यकर्ते जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांना हा रात्रीचा गनिमीकावा समजताच दोन पोलीस गाड्या हायवेवर आल्या व त्यांना ताब्यात घेऊन गेल्या. यामुळे महामार्ग बंद होता होता रोखला गेला,
आंदोलनकर्त्यांकडून पंचगंगा नदीवर पुणे-बंगलोर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 03:28 IST