शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

कोल्हापूर खंडपीठासाठी आंदोलन तीव्र

By admin | Updated: September 12, 2014 23:36 IST

विवेक घाटगे : कोल्हापूर खंडपीठासाठी वकिलांची मोर्चेबांधणी

सिंधुदुर्गनगरी : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी पुन्हा एकदा वकिलांनी कंबर कसली आहे. सहाही जिल्ह्यातील वकिलांची भेट घेऊन कोल्हापूर येथे या सर्वांचा लवकरच मेळावा घेऊन आगामी आंदोलनाचे धोरण निश्चित केले जाणार आहे आणि स्वतंत्र खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचे नियोजन करू, असे प्रतिपादन उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी केले.मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहाही जिल्ह्यातील वकिलांचा संघर्ष सुरू असून, हा संघर्ष अधिक तीव्र करून खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सध्या कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्यावतीने कोल्हापुरातील वकील सहाही जिल्ह्यांचा प्रवास करीत असून, आज हे सर्व वकील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा वकील संघटना सभागृहात अ‍ॅड. राजेंद्र रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती अध्यक्ष अ‍ॅड. घाटगे बोलत होते. यावेळी सचिव राजेंद्र मंडलिक, कोल्हापूर नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक ठाकूर, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. विनय कदम, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना सचिव अ‍ॅड. विरेश नाईक, अ‍ॅड. व्ही. पी. चिंदरकर, अ‍ॅड. राजीव बिले, अ‍ॅड. दीपक नेवगी, अ‍ॅड. उमेश सावंत, जिल्हा सरकारी वकील अमोल सावंत आदी उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले की, ५८ दिवसांच्या आंदोलनात सर्वांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंदोलनाला चांगली साथ मिळाली. मुख्य न्यायमूर्तींनी मुख्यमंत्र्यांना या खंडपीठासंदर्भात ठराव घेण्याबाबत कळविले आहे. तरीही जोवर खंडपीठ अस्तित्त्वात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवावे लागेल. सभाध्यक्ष अ‍ॅड. रावराणे म्हणाले, लोकन्यायालये, कायदाविषयक प्रबोधन शिबिरे आणि न्यायालयांच्या विविध उपक्रमांवर वकिलांनी यापुढे बहिष्कार घालावा लागेल तरच ते आंदोलन आणखीन प्रभावी होईल. हुबळी खंडपीठासाठी तेथील वकिलांनी छेडलेल्या आंदोलनाचे उदाहरण अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिले. खंडपीठासाठी सात वेळा पाठविलेला प्रस्ताव तेथील उच्च न्यायालयाने नाकारला. शेवटी आठव्यावेळी मंजूर केला. तोपर्यंत तेथील वकिलांनी चिकाटी सोडली नव्हती. अ‍ॅड. विनय कदम, अ‍ॅड. हलगे यांनी एकजुटीने हा लढा लढला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आंदोलन तीव्र करण्यासाठी आमचा सहभाग आहे, असे अ‍ॅड. राजीव बिले यांनी सांगितले. अ‍ॅड. विरेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कोल्हापुरातून सुमारे ४० वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)