शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पाठबळाने एजंट गब्बर, त्यातूनच बोगस कामगारांचे जाळे..; कोट्यवधी रुपयांची लूट 

By उद्धव गोडसे | Updated: July 31, 2025 17:15 IST

सहायक कामगार आयुक्तांकडून सुरू झालेल्या तपासणीमुळे अनेकांचे बिंग फुटणार

उद्धव गोडसेकोल्हापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात. याचा लाभ उठविण्यासाठी गावागावांत एजंट सक्रिय झाले आहेत. त्यांनी बनावट दाखले तयार करून बोगस कामगारांची फौजच कागदोपत्री तयार केली आहे. मंडळाच्या योजनांचा लाभ घेणारे आणि बोगस कामगारांकडून कमिशन उकळणारे एजंट गब्बर झाले आहेत. राजकीय पाठबळामुळे त्यांचे फावले होते. मात्र, आता सहायक कामगार आयुक्तांकडून सुरू झालेल्या तपासणीमुळे अनेकांचे बिंग फुटणार आहे.गेल्या १०-१२ वर्षांत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला कोट्यवधी रुपयांचा मिळाला. या पैशातून बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार मंडळाकडे नोंदणी असलेल्या कामगारांना सुरक्षा साहित्याचा संच देणे, ७५ टक्के दिव्यांग कामगारांना दोन लाखांची आर्थिक मदत करणे, कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत वैद्यकीय उपचार करणे, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मुलीच्या लग्नासाठी आर्थिक साहाय्य, संसारोपयोगी भांडी, घरकुल, काम करताना किंवा अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाते.

वाचा- बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी, ४५ लाखांचा गंडा; कोल्हापुरात २५ जणांवर गुन्हा अशा विविध योजनांचा लाभ उठविण्यासाठी काही एजंटनी बोगस कामगारांच्या नोंदी सहायक कामगार आयुक्त कार्यालयांकडे केल्या आहेत. बांधकाम क्षेत्राशी काही संबंध नसलेल्या हजारो नावांची नोंदणी केली. त्यांच्या नावावर एजंट लाभ उठवत आहेत. राजकीय पाठबळामुळे राज्यात सर्वत्र हीच स्थिती असल्याने मंडळाच्या कोट्यवधी रुपयांची लूट सुरू आहे.पडताळणीच नाहीकल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांची वेळोवेळी पडताळणी करणे गरजेचे होते. मात्र, कोणतीही खातरजमा न करता नोंदणी झाली आणि लाभाचे वाटपही झाले. तक्रारींचा ओघ वाढताच सहायक कामगार आयुक्तांकडून वेगवेगळ्या जिल्ह्यांत तपासणी सुरू झाली आहे. यातून बोगस बांधकाम कामगारांसह एजंटच्या साखळीचा पर्दाफाश होणार आहे. त्यामुळे एजंटगिरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बनावट दाखल्यांचे रॅकेटमोठे आर्थिक लाभ मिळविण्यासाठी बनावट दाखले तयार करून देणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून मृत्यू दाखले, दिव्यांग दाखले, शैक्षणिक कागदपत्रे तयार करून दिली जात आहेत. मुलीच्या लग्नासाठी मिळणारी मदत लाटण्यासाठी लग्न झाल्याचे कागदोपत्री दाखवले जाते. असे अनेक गंभीर प्रकार राज्यात सर्वत्र सुरू आहेत.