- नसिम सनदी कोल्हापूर : अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना सरकारी योजनांचे लाभ देता यावेत, म्हणून केंद्र सरकारने ज्येष्ठत्वाची वयोमर्यादा पाच वर्षांनी कमी करून ती ६५ वरून ६० वर्षावर आणली. या निर्णयाला वर्ष झाले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने जेष्ठ नागरिक सवलतीपासून लांबच आहेत.मागील वर्षी ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले गेले. रेल्वेमध्ये ६० वर्षांच्या अटीनुसार प्रवासात सवलत मिळते; पण त्याच वेळी एस.टी. महामंडळ मात्र ६५ वर्षांचीच अट लादत आहे.एस.टी. महामंडळातर्फे केवळ आधार कार्ड किंवा निवडणूक कार्डवर ५० टक्के सवलतीत ज्येष्ठांना प्रवास करता येत होता; पण आता केवळ ४००० किलोमीटरपर्यंतच मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी स्मार्ट कार्डची अट घालण्यात आली आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३०० रुपये खर्च करावा लागत आहे.>वयोमर्यादा कमी केल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून सामाजिक न्यायमंत्री, परिवहन मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला; पण कोणीही गांभीर्याने दखल घेतली नाही.- रवींद्र शिंदे,ज्येष्ठ नागरिक, कोल्हापूर
वयोमर्यादा ६५ वरून ६0 झाली; पण लाभ नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 05:14 IST