शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घाटकोपर दुर्घटनेनंतर कोल्हापूर महानगरपालिका झाली अलर्ट, नागरिकांना दिल्या सूचना

By भारत चव्हाण | Updated: May 14, 2024 17:35 IST

कोल्हापुरात बेकादेशीर होर्डिंग किती..जाणून घ्या

कोल्हापूर : जाहीरात होर्डिंग कोसळून मुंबईत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने शहरातील होर्डिंग व्यवसायीकांची बैठक घेतली. शहरात लावलेल्या होर्डिंगची स्टॅबिलीटी तपासून घ्यावी तसेच ‘वादळी वाऱ्याच्या वेळी होर्डिंगखाली कोणीही थांबू नये’ असे फलक होर्डिंगच्या खाली लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. वादळी वारे तसेच जोराच्या पावसाने शहरात होर्डिंग कोसळण्याची घटना घडणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घ्यावी, अशी सूचना उपायुक्त साधना पाटील यांनी बैठकीत केली. यावेळी इस्टेट अधिकारी विलास साळोखे शहरातील होर्डिंग व्यावसायीक असोसिएशनचे अध्यक्ष अमित सांगावकर, संदीप खामीतकर, सुहास सांगवडेकर, किरण शिंदे, ज्ञानदेव पाटील, सर्जेराव पाटील, रणजीत चौगले उपस्थित होते.कोल्हापूर शहरात जवळपास ६९१ होर्डिंग लागले असून त्यासाठी व्यावासायीकांनी महापालिका प्रशासनाकडून रितसर परवाना घेतले आहेत. यातील ६६ होर्डिंग हे महापालिकेच्या जागेवर, ६२५ होर्डिंग खासगी मिळकतीवर आहेत. दहा एलईडी होर्डिंग आहेत. महापालिकेच्या पॅनेलवरील इंजिनिअरकडून प्रत्येक वर्षी या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट घेऊन ते महापालिका इस्टेट विभागाला देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत रस्त्याच्या कडेला उभे केलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोल्हापुरात चार होर्डिंग बेकादेशीर असून संबंधितांना तातडीने ते उतरवून घेण्याची नोटीस दिल्याचे इस्टेट अधिकारी विलास साळोखे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर