शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अमिन सयानी म्हणतात,"आप सुन रहे हैं आकाशवाणी का कोल्हापूर एफ एम"

By संदीप आडनाईक | Updated: February 21, 2024 19:26 IST

रियाज शेख आणि नीना मेस्त्री-नाईक यांच्यामुळे कोल्हापूरचे श्रोते रोज ऐकतात  त्यांचा आवाज

कोल्हापूर :  भारदस्त आवाजाचे मालक लोकप्रिय रेडिओ उद्घोषक अमिन सयानी बुधवारी काळाच्या पडद्याआड गेले, पण त्यांच्या आवाजात कोल्हापूर आकाशवाणीची स्टेशन आयडेन्टी "आप सुन रहे हैं आकाशवाणी का कोल्हापूर एफ एम" ही त्यांच्या खास शैलीतील धून कोल्हापूरच्या रसिक श्रोत्यांना रोज ऐकायला मिळते ते कोल्हापुरातील त्यांचे निस्सीम चाहते रियाज शेख आणि नीना मेस्त्री-नाईक यांच्यामुळे. आवाजाचे जादूगार अमीन सयानी यांचे बुधवारी निधन झाले. यानिमित्ताने कोल्हापुरातील आकाशवाणीच्या त्यांच्या आठवणींना त्यांच्या रसिक श्रोत्यांनी  उजाळा दिला. अमीन सयानी हे लोकप्रिय रेडिओ उद्घोषक होते. कोल्हापूर आकाशवाणी साठी पूर्वी काम करणारे रियाज शेख आणि नीना मेस्त्री नाईक हे दोघेही त्यांचे निस्सीम चाहते. 

कोल्हापूर आकाशवाणीची स्टेशन आयडेन्टी त्यांच्या खास शैलीत असावी असा आग्रह त्यांनी सयानी यांच्याकडे केली आणि त्यांनीही तत्परतेने "आप सुन रहे हैं आकाशवाणी का कोल्हापूर एफ एम" ही  धून त्यांना पाठवली आणि आजही दहा सेकांदाची ही धून कोल्हापूर आकाशवाणी केंद्र रोज वाजवते. पाच वर्षांपूर्वी या घडामोडी घडल्या. रेडिओ सिलोनवर आजही त्यांच्या "बहनो और भाइयों" असे श्रोत्यांना संबोधित करण्याची त्यांची शैली लोकप्रिय आहे. कोल्हापुरातील रेडिओ उद्घोषक रियाज शेख आणि नीना मेस्त्री नाईक यांचा त्यांच्याशी स्नेह होता. 

रियाज शेख आणि नीना मेस्त्री नाईक यांनी नोकरीच्या पलीकडे जाऊन कोल्हापूर आकाशवाणीसाठी ही धडपड केली होती आणि ती सत्यात उतरल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला होता. नीनाचा हिंदी पट्ट्यातील  ऑल इंडिया रेडिओ आणि विविध भारतीच्या उद्घोषकांची चांगला संपर्क होता. -अरुण नाईक, कला प्रेमी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर