शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाचा पाकिस्तानवर सहज विजय, कोल्हापुरात शिवाजी चौकात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी

By संदीप आडनाईक | Updated: September 15, 2025 00:45 IST

भारतीय संघाने पाकिस्तानवर सहज एकतर्फी विजय मिळवताच कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी तरुण क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला.

संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर सहज एकतर्फी विजय मिळवताच कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी तरुण क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला.

पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना झाला. विजयाची चाहूल लागताच अनेक तरुणांनी अकरा वाजताच आपला मोर्चा चौकाकडे वळवला. तिरंगा आणि भगव्या झेंड्यांसह गर्दी वाढू लागली. स्पीकरवर विजयी गीत वाजवत अनेकजण चौकात थिरकू लागले.दुचाकीच्या पुंगळ्या काढून तरुणांचा लोंढा शहरातून फिरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमला. विजयावर शिक्कामोर्तब होताच एकच जल्लोष आणि आतषबाजी करण्यात आली. जय श्रीराम, वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा देत क्रिकेटप्रेमींनी सुमारे तासभर जल्लोष केला. लहान मुलांना खांद्यावर घेऊन अनेकजण नाचत होते. मोबाईल कॅमेऱ्यावर अनेकजण व्हिडिओ, रिल्स करत होते. अनेकजण सेल्फी काढत होते. महिला, मुले आणि तरुण बेभानपणे नाचत होते.

पोलीसांकडून गस्त, तगडा बंदोबस्त

अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शहरातील धार्मिक स्थळे,रस्त्यावर पोलीसांनी चोख बंदोबस्त नेमला होता. वरिष्ठ अधिकारी आपल्या हद्दीवर लक्ष ठेवून होते. जिल्ह्यत कुठेही अनुचित प्रकार घडू नये अथवा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही असे कृत्य घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून होते. शीघ्र कृती दलाचे दोन प्लॅटून बंदोबस्तासाठी तैनात होते. बाराच्या ठोक्याला रात्री चौकात जमलेल्या तरुणांना घरी जाण्याचे आवाहन करत पोलिसांनी येथील गर्दी पांगवत परिसर मोकळा केला. नंतर शहरातून गस्त घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानkolhapurकोल्हापूर