शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

आयुक्तांच्या नाराजीनंतरही ‘गुपचिळी’

By admin | Updated: June 22, 2015 00:19 IST

विभागीय क्रीडा संकुल : क्रीडा कार्यालय ठेकेदारावर काय कारवाई करणार

कोल्हापूर : दोन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचे होळी पौर्णिमेदिवशी लोकार्पण झाले. मात्र, क्रीडा कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचा दर्जा तपासण्याची तसदी घेतली नाही. मात्र, विभागीय आयुक्तांनी नुकतीच या संकुलाला भेट दिल्यानंतर झालेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत दर्जा तपासून ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या; परंतु या सूचना केवळ सूचनाच न राहता आता ठेकेदारावर क्रीडा कार्यालय अथवा जिल्हा प्रशासन कारवाई करणार की पुन्हा नेहमीप्रमाणेच ‘अळीमिळी गुपचिळी’ होणार, याकडे तमाम क्रीडारसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ संकुलाचे काम कधी निधी कमी आहे, तर कधी मालाचे दर भडकल्याने बंद होते. प्रथम क्रीडासंकुल उभारण्यासाठी तत्कालीन सरकारने १४ कोटी रुपयांची निविदा काढली. पुढे १४ कोटी रुपयांत हे संकुल उभारणे शक्य नाही म्हणून शासकीय पातळीवर पुन्हा १६ कोटींची निविदा मंजूर करण्यात आली. पुढे बांधकामासाठीच्या कच्च्या मालाचे दरही भडकले. प्रथम थकीत बिल न मिळाल्याने ठेकेदाराने काम बंद ठेवले. पुढे मार्च २०१४ मध्ये ३७ कोटी ३३ लाखांचे सुधारित अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवले. ३६ कोटी ८२ लाख रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक मार्च महिन्यात मंजूर केले. जुलैपर्यंत तीन वेळा ब्रेक घेत कसेबसे ७० टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर थकीत बिल, सुधारित दर यांवर संकुलाचा गाडा पुढे जाईना. अखेर राज्यातील सरकारही बदलले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आदेश दिल्यानंतर ५ मार्च २०१५ रोजी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन करणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मला हे काम त्यापूर्वी तयार झालेले दिसले पाहिजे, अन्यथा मी आपल्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार, अशी धमकी दिली. त्यानंतर कसेबसे हे काम ठेकेदाराने पूर्ण केले. या कामाची पाहणी पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी मागील आठवड्यात केली. यावेळी त्यांनी ४०० मीटर धावपट्टी, फुटबॉल मैदान, जलतरण तलाव, कबड्डी मैदान, व्हॉलिबॉल मैदान, शूटिंग रेंज, आदींची पाहणी केली. दर्जाबाबत नाराजी व्यक्त करीत ठेकेदारावर कारवाईचे संकेत दिले. क्रीडा कार्यालय किंवा जिल्हा प्रशासन याबाबत ठेकेदारावर काय कारवाई करते याकडे तमाम क्रीडारसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. कामाच्या दर्जाच्या तपासणीचे काय झालेठेकेदाराने केलेल्या कामाची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व तज्ज्ञ यांच्या समितीद्वारे केली जाणार, असे खुद्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ३१ जानेवारीच्या ठेकेदार व जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत जाहीर केले होते. मात्र, तो मुद्दा पुन्हा विभागीय आयुक्तांनीच उकरून काढल्याने तपासणी अहवालाचे काय झाले, असा प्रश्न अनुत्तरितच राहत आहे.