शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

जयंती नाला पाठोपाठ संध्यामठही झाला चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:17 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात जयंती नाल्यासह रंकाळा तलावातील संध्यामठ परिसराची स्वच्छता करण्यात आली. नालापात्रातील गाळ जेसीबी, पोकलँडच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. अभियानात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळा

ठळक मुद्देजयंती नाला पाठोपाठ संध्यामठही झाला चकाचकलोकसहभागातून स्वच्छता मोहीम : नाल्याचे पात्र रूंदावले

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात जयंती नाल्यासह रंकाळा तलावातील संध्यामठ परिसराची स्वच्छता करण्यात आली. नालापात्रातील गाळ जेसीबी, पोकलँडच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. अभियानात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.प्रारंभी सिद्धार्थनगर येथे महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी क्रिडाई, स्वरा फौंडेशन, जिल्हा बार असोसिएशन, के. एम. टी.कडील कर्मचारी यांच्यासमवेत स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छता करण्यात आली.अभियानामध्ये सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, विविध संघटनांनी सहभाग नोंदवून या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जयंती नाल्याचे पात्र जेसीबीने रूंदीकरण केले. हुतात्मा पार्क गार्डन उद्यानाची व जयंती नाला सभोवतालची स्वच्छता केली. पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, दिलीप देसाई, दिलीप पोवार, माजी महापौर अ‍ॅड. महादेव आडगुळे, क्रिडाईचे सदस्य यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलताना संपूर्ण नालापात्रमधील गाळ जेसीबी, पोकलँडचा वापर करून काढण्यात येत आहे. नाला पात्र रूंदीकरण करण्यात येत असल्याने जयंती नाला बंधाऱ्यावरून सांडपाणी ‘ओव्हरफ्लो’ होऊन पंचगंगा नदीचे होणारे प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.अभियानामध्ये प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, नगरसेवक सचिन पाटील, शेखर कुसाळे, अतिरिक्तआयुक्तश्रीधर पाटणकर, साहाय्यक आयुक्तसंजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, नगरसचिव दिवाकर कारंडे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, उपशहर अभियंता आर. के. जाधव, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, इस्टेट प्रमोद बराले, क्रिडाई, स्वरा फौंडेशन, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांचे पदाधिकारी व सदस्य, गार्डन, ड्रेनेज, घरफाळा, विभागीय कार्यालयाकडील कर्मचारी, आरोग्य विभागाकडील ३०० कर्मचारी, अधिकारी, स्वयं संस्थेचे कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.येथे राबविली मोहीमही स्वच्छता मोहीम सिद्धार्थनगर, जयंती नाला पंपिंग हाऊस ते गाडी अड्डा, रिलायन्स मॉल पिछाडी ते ओढ्यावरचा गणपती मंदिर, बुद्धगार्डन ते अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल व रंकाळा तलाव संध्यामठ परिसरात राबविण्यात आली.परिसरात स्वच्छताहुतात्मा पार्क गार्डन उद्यानाची व जयंती नाला सभोवतालची स्वच्छता करण्यात आली. उद्यानामध्ये उपस्थित असलेले निसर्गप्रेमी व फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.पाणी प्रवाही, प्रदूषणही कमीजमा केलेला प्लास्टिक कचरा सात डंपर, दोन जेसीबीच्या साहाय्याने गोळा करण्यात आला. जेसीबीच्या साहाय्याने नाला पात्र रूंदीकरणही करण्यात आले; त्यामुळे पावसाळ्यामध्ये निर्माण होणारा जादा पाण्याचा प्रवाह हा प्रभावित राहणार असून, नाल्यातून वाहणारा कचरा व प्लास्टिक यामुळे पंचगंगा नदीचे होणारे प्रदूषणही कमी होणार आहे.

 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर