शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा १५ ऑक्टोबरनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 15:25 IST

Shivaji University, kolhapurnews, educationsector, online, exam शिवाजी विद्यापीठाने अंतिम सत्रातील लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी पुण्यातील एजन्सी निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाने दि. १५ ऑक्टोबरनंतर या परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय विद्या परिषद घेणार आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांत प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ऑनलाईन परीक्षेसाठी पुण्यातील एजन्सीची निवड

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने अंतिम सत्रातील लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी पुण्यातील एजन्सी निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाने दि. १५ ऑक्टोबरनंतर या परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय विद्या परिषद घेणार आहे.

विद्यापीठाने दि. १० ऑक्टोबरपासून अंतिम सत्र, वर्षाची परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र, लेखणी बंद आंदोलन आणि परीक्षा घेण्यासाठीच्या एजन्सी निवडीची प्रक्रिया लांबल्याने विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलावी लागली. एजन्सीची निवड झाल्याने आता परीक्षेच्या तयारीची गती वाढली आहे.

वेळापत्रक निश्चितीचे काम सुरू झाले आहे. परीक्षा घेण्याच्या संगणक प्रणालीमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नसंच (एमसीक्यू) अपलोड करणे, आदींबाबत या एजन्सीकडून येत्या दोन दिवसांमध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळातील कर्मचारी, परीक्षाविषयक काम करणारे प्राध्यापक आणि महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अंतिम सत्र, वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७० हजार आहे. त्यांतील ५८४०० विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याबाबतच्या पर्यायाची विद्यापीठाकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे. अद्याप १०६०० विद्यार्थ्यांनी पर्याय नोंदविलेला नाही. त्यांच्यासाठी पर्याय नोंदविण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवारपर्यंत आहे. या मुदतीमध्ये जे विद्यार्थी पर्यायाची नोंद करणार नाहीत. त्यांना विद्यापीठ सांगेल त्या पर्यायानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे.तीन सत्रांमध्ये होणार परीक्षाविद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाला दि. ३१ ऑक्टोबरपूर्वी परीक्षा घेण्याची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाला सुटी वगळता १० दिवसांमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन करावे लागणार आहे. रोज सकाळी ११ ते दुपारी १२, दुपारी एक ते दोन आणि दुपारी चार ते सायंकाळी पाच या वेळेत परीक्षा होणार आहे.विद्यार्थ्यांसाठी ओटीपी महत्त्वाचाऑनलाईन परीक्षेत विद्यापीठाकडे नोंद असलेल्या विद्यार्थ्याला ओटीपी पाठविण्यात येईल. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्याची ओळख ठरणार आहे. त्याने ओटीपी टाकल्यानंतर त्याच्या स्क्रीनवर प्रश्नपत्रिका दिसणार आहे.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरexamपरीक्षा