शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हकालपट्टीनंतर सदाभाऊंच्या नव्या संघटनेचा लवकरच नारळ फुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 20:16 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना काढण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या दस-याच्या मुहूर्तावर नवीन संघटनेची घोषणा करणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

ठळक मुद्देस्वतंत्र संघटना काढण्याची तयारी शेतकऱ्यांसाठी लढत राहण्याचा निर्धारनवीन संघटनेचे नाव अद्याप ठरलेले नाहीराजू शेट्टी यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल

कोल्हापूर, दि. 13 -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना काढण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या दस-याच्या मुहूर्तावर नवीन संघटनेची घोषणा करणार असल्याची चर्चा सुरु आहे. संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सदाभाऊ खोत द्विधावस्थेत आहेत. मात्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन संघटना काढून आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नवीन संघटनेचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र, ‘रयत शेतकरी संघटना’ असे नाव देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. याविषयी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यभरातील शेतकऱ्यांची मते जाणून संघटनेचे नाव ठरविले जाणार आहे. नवीन संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी नावे सुचवली आहेत. यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. स्वाभिनामी शेतकरी संघटनेत काम करत असताना मला काही कारण नसताना चक्रव्यूहात गोवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आत्तापर्यंत आम्ही अनेक वार झेलले आहेत. आम्ही संघटनेच नेतृत्व उभे केले. मात्र, नेतृत्वावर कधीही शिंतोडे उडू दिले नाहीत. यापुढे आम्हाला कोणी अपमानित करु शकणार नाही. तसेच, माझ्या कार्यकर्त्याला सन्मान मिळेल, असेही यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले. 

सदाभाऊ खोतांची हकालपट्टी...कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी संघटनेविरोधात भूमिका मांडत असल्याने त्यांना संघटनेत ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सदाभाऊ खोत यांची चौकशी केल्यानंतर त्यांची संघटनेतून हकालपट्टी केली. 

आरोपांमुळे संघटनेची बदनामी...आजवर सदाभाऊ खोत यांनी केलेले काम लक्षात घेता आणि त्यांच्यावर गेल्या काही दिवसांत झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांची समितीने हकालपट्टीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावर होणा-या आरोपांमुळे संघटनेची बदनामी होत आहे, स्वाभिमानी सदस्य समितीचे दशरथ सावंत यांनी सांगितले. 

सदाभाऊंच्या हकालपट्टीचा निर्णय योग्य... सदाभाऊ खोत यांच्या संबंधी निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीला पूर्ण अधिकार देण्यात आले होते. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत समितीने घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे शेतकरी संघटनेवर किंवा चळवळीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.