चंदगड : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अण्णा’हत्तीचा वावर असतानाच आता बिबट्याची एंट्री झाली आहे. देसाईवाडी परिसरात बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. जीवितहानी होण्याआधी बिबट्याचा बंदोबस्त करा, अशी सक्त ताकीद आमदार शिवाजी पाटील यांनी वनविभागाला दिली. दरम्यानच, वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, वनपाल कृष्णा डेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी नागरिकांना जनजागृती करत मार्गदर्शन केले. वनविभाग दक्ष असून ध्वनीक्षेपकाद्वारेही चंदगड शहरात बिबट्याविषयी जनजागृती केल्याचे वनक्षेत्रपाल गायकवाड यांनी सांगितले. संपूर्ण राज्यभर बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी जीवितहानी झाली आहे. त्यामुळे चंदगडसह परिसरातील नागरिकांसोबत वनविभाग सतत संवाद साधत आहे. नागरिकांनीही दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.
Web Summary : After elephant sightings, a leopard entered Chandgad, killing a dog. Citizens are fearful. MLA Shivaji Patil urged forest department action. The forest department is raising awareness and asking for public cooperation to prevent harm.
Web Summary : हाथी दिखने के बाद, चंदगढ़ में तेंदुए के घुसने से दहशत है। तेंदुए ने एक कुत्ते को मार डाला। विधायक शिवाजी पाटिल ने वन विभाग से कार्रवाई का आग्रह किया है। वन विभाग जागरूकता बढ़ा रहा है और नुकसान से बचाने के लिए जनता से सहयोग मांग रहा है।