शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर कोल्हापूर शहरात अतिक्रमण विरोधात तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:44 IST

कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौक व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे; त्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या मदतीने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अतिक्रमण कारवाई सुरू करणार आहे. या कारवाईपूर्वी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, नुकसान टाळावे, असे आवाहन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केले आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीनंतर कोल्हापूर शहरात अतिक्रमण विरोधात तडाखानागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : शहरातील प्रत्येक चौक व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे; त्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या मदतीने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अतिक्रमण कारवाई सुरू करणार आहे. या कारवाईपूर्वी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, नुकसान टाळावे, असे आवाहन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केले आहे.शहरात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. आरटीओ कार्यालय, कसबा बावड्यातील भगवा चौक, राजर्षी शाहू जन्मस्थळ, भाजी मंडई, महावीर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका मुख्य कार्यालय परिसर, मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी, गंगावेश परिसर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी परिसर, भवानी मंडप परिसरात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.

शहरातील सर्व फुटपाथ अतिक्रमणाने व्यापले आहेत. नागरिक व नगरसेवकांनी मागणी करूनही ठोस कारवाई होत नाही; त्यामुळे नागरिकांत रोष आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमण मोहीम तीव्र करण्याचे आदेश आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहेत. या कारवाईस लोकप्रतिनिधी व नागरिक किती साथ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

महापालिका क्षेत्रातील नागरिक, व्यावसायिकांनी फुटपाथ, रहदारीचे चौक, मंडई, महानगरपालिकेच्या खुल्या जागा, आदी ठिकाणी अनधिकृतपणे व महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय अनेक ठिकाणी बांधकामे व अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे रहदारीला अडथळा ठरत आहेत. अशी सर्व अतिक्रमणे स्वत:हून आठ दिवसांत संबंधितांनी काढून घ्यावीत. महापालिकातर्फे शहरातील सर्व अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही सुरू करणार असून, यामध्ये कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान झाल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही.- नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता)

 

पोलीस प्रशासन सकारात्मकपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महापालिकेने मागणी न करतानाही अतिक्रमण कारवाईसाठी मदत म्हणून पोलिसांचे एक पथक कायमस्वरूपी देण्याची ग्वाही दिली आहे. पोलीस बंदोबस्त सहज उपलब्ध होणार असल्याने महापालिकेला कारवाई करणे सोपे होणार आहे. सर्वसमावेशक व सातत्य ठेवत महापालिकेने अतिक्रमणविरोधात धडाका लावावा, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर