शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या लेखी मागणीनंतर औषध द्या

By admin | Updated: March 18, 2015 00:06 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी निर्णय

सांगली : जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या लेखी मागणी पत्रानुसारच औषध पुरवठा करणे बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कडक पावले उचलली असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुध्द कारवाई करण्याकरिता गठित केलेल्या जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक आज (मंगळवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. या बैठकीस जिल्हा सरकारी वकील चंद्रकांत माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. गिरीगोसावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे, पोलीस निरीक्षक अशोक भवड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता माने, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी, समितीचे सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील, डॉ. राहुल मोरे, सुरेश भोसले, दुष्यंत माने, डॉ. संजीवकुमार वाटेगावकर आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.यावेळी गायकवाड म्हणाले की, जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांना आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कडक पावले उचलली असून, अन्न व औषध प्रशासन विभागाने औषध व सौंदर्यप्रसाधने कायद्यामधील तरतुदींची कडक अंमलबजावणी करावी. यानुसार डॉक्टरांचे लेखी मागणीपत्र घेऊनच औषध पुरवठा करण्यात यावा. या कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले. डॉक्टरांना औषध पुरवठा करताना डॉक्टरांची शैक्षणिक अर्हता आदी बाबींची खात्री करूनच औषध विक्री करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्याचे औषध निरीक्षक व्ही. व्ही. नांगरे यांनी सांगितले.बोगस डॉक्टरांची लोकांना माहिती व्हावी म्हणून प्रत्येक गावाच्या ग्रामसभेत बोगस डॉक्टरांविषयी स्वतंत्र विषय घेऊन ग्रामसभेत चर्चा घडवून आणावी. याकामी आरोग्य विभाग आणि गटविकास अधिकाऱ्यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या दवाखान्याच्या फलकांवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचना ठळकपणे प्रसिद्ध करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. (प्रतिनिधी)पंचकर्म उपचार केंद्रांचा सर्व्हे करणार बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र पथके नियुक्त करण्याबरोबरच बोगस डॉक्टरांची माहिती देणाऱ्यांसाठी तसेच बोगस डॉक्टरांच्या शिक्षणाविषयी माहिती देणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना राबविण्याची सूचनाही करण्यात आली. आयुर्वेदिक पंचकर्म उपचार केंद्राच्या व्यावसायिकांचा सर्व्हे करावा, या सर्व्हेमध्ये बोगस डॉक्टर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.