शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेनंतर आजऱ्यातील पेच सुटला

By admin | Updated: January 24, 2017 00:27 IST

भाजपला एक जागा : हाळवणकर यांची शिष्टाई; चराटी यांच्या उपस्थितीत निघाला तोडगा

कोल्हापूर : आजरा जिल्हा परिषद मतदारसंघातील दोनपैकी एक पंचायत समितीची जागा भाजपला देण्याचा तोडगा काढण्यात आला आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांनी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी आणि आजरा भाजपशी समोरासमोर चर्चा करून हा तोडगा काढल्याने आजऱ्यात निर्माण झालेला पेच सुटेल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. सोमवारी दुपारी कागलजवळ झालेल्या एका बैठकीत हा तोडगा काढण्यात आला. आजरा साखर कारखान्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजरा तालुका महाआघाडी स्थापन झाली. अशोक चराटी, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, सभापती विष्णुपंत केसरकर यांनी या महाआघाडीचे नेतृत्व करत आजरा साखर कारखान्याची सत्ता मिळविली. भाजपचेही दोन संचालक निवडून आले. मात्र, आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ ‘इतर मागास’साठी आरक्षित झाल्यानंतर चराटी यांनी ‘इतर मागास’चा दाखला काढल्याने भाजपचे नेते, कार्यकर्ते दुखावले. आजरा जिल्हा परिषद, आजरा पंचायत समिती आणि पेरणोली पंचायत समिती या तिन्ही जागा ताराराणी आघाडीला देण्याबाबतचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मात्र कधी नव्हे ते भाजपचे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ताराराणी आघाडीच्या मेळाव्याला जाण्याचे टाळले. त्यामुळे ताराराणी आघाडी आणि भाजपमध्ये आजरा तालुक्यात मतभेद असल्याचे वातावरण तयार झाले. त्याची दखल घेत या सर्वांना हाळवणकर यांनी रविवारी रात्री निरोप देऊन सकाळी बोलावून घेतले. आम्ही एकीकडे जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्यासाठी एक-एक माणूस गोळा करताना तुम्ही अशी भूमिका घेऊ नका, असे सांगितले. मात्र, तीनपैकी किमान एकतरी जागा भाजपकडे हवी, अशी ठाम भूमिका या बैठकीत आजरा भाजपने मांडल्याचे कळते. त्यानंतर मग तातडीने चराटी यांना बोलावून घेण्यात आले. समोरासमोर चर्चा होऊन अखेर पंचायत समितीची एक जागा भाजपला देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपचे आजरा तालुकाध्यक्ष अरुण देसाई, बापू टोपले, आजरा साखर कारखान्याचे संचालक जितू टोपले, मलिक बुरूड, प्रा. सुधीर मुंज, दयानंद भुसारी यांनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी) महादेव पाटील-धामणेकर भाजपच्या संपर्कातआजरा पंचायत समितीचे माजी सदस्य महादेव पाटील-धामणेकर हे भाजपच्या संपर्कात आहेत. रविवारी त्यांनी कोल्हापुरात चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. उत्तूर विभागात भाजपचे काम करण्याची त्यांनी तयारी दर्शविल्याचे सांगण्यात आले.