शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
4
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
5
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
6
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
7
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
8
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
9
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
10
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
11
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
12
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
13
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
14
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
15
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
16
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
17
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
18
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
19
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
20
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज

प्रशासकांच्या कानउघाडणीनंतर यंत्रणा लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST

काेल्हापूर : दीड महिन्यापूर्वी आदेश देऊनही महापालिकेच्या ओपन स्पेसवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यास चालढकलपणा का सुरू आहे? कामात हलगर्जीपणा खपवून ...

काेल्हापूर : दीड महिन्यापूर्वी आदेश देऊनही महापालिकेच्या ओपन स्पेसवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यास चालढकलपणा का सुरू आहे? कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, अशा शब्दांत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी संबंधितांची कानउघाडणी केली. यानंतर युद्धपातळीवर संबंधित विभागाची कारवाईसाठी यंत्रणा कामाला लागली. तीन तासांत चार ओपन स्पेसवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

लाईन बझार येथील दोन ओपन स्पेसमधील अनधिकृत सात शेड, निवारा कॉलनी येथील एक वीट बांधकामाचे शेड व रमणमळा येथील एक पत्र्याचे शेड काढण्यात आले. ही कारवाई महापालिकेच्या नगररचना, अतिक्रमण, इस्टेट विभाग व विभागीय कार्यालय क्रमांक ४ च्या वतीने करण्यात आली. लाईन बझार येथील कारवाईवेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी करून ओपन स्पेसवरील सर्व अतिक्रमणे काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. एक जेसीबी व दोन डंपरच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमणचे पंडित पोवार, व्ही. एन. सुरवसे, सर्व्हेअर श्याम शेटे, अनिल पाटील यांनी केली.

चौकट

आता तुमच्यावर कोणाचा दबाव ?

महापालिकेमध्ये मंगळवारी विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली. या बैठकीची सुरुवातच शहरातील ओपनस्पेसवरील अतिक्रमणावरून झाली. दीड महिन्यापूर्वी कारवाई करण्याचे सांगूनही दुर्लक्ष का केले? महापालिकेची सभागृहाची मुदत संपली असून आता तुमच्यावर कारवाईसाठी कोणाचा दबाव आहे, अशा शब्दांत प्रशासक डॉ. बलकवडे यांनी संबंधितांना सुनावले.

फोटो : १२०१२०२१ ओपन स्पेस कारवाई

ओळी : कोल्हापूर महापालिकेने मंगळवारी ओपन स्पेसवरील अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने हटविले.